रजनीकांत यांच्या प्रयत्नांना यश..! धनुषनं घेतला त्याच्या आयुष्यातील ‘मोठा’ निर्णय; वाचा!

WhatsApp Group

Dhanush Aishwaryaa Divorce Update : दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, हे जोडपे घटस्फोट घेणार नाहीत. धनुष आणि ऐश्वर्याने यावर्षी जानेवारीत घटस्फोटाची घोषणा केली होती, पण आता दोघांनीही आपला विचार बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनुष आणि ऐश्वर्याला आता त्यांच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, निर्णयापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांची रजनीकांत यांच्या घरी बैठक झाली. यादरम्यान सर्वांनी धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट थांबवण्याचा निर्णय घेतला. हे जोडपे त्यांच्या नात्यावर काम करण्याचा प्रयत्न करतील असेही ठरले. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रजनीकांत यांनी आपल्या मुलीचे घर वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

हेही वाचा – IPL खेळलेल्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..! हॉटेलमध्ये १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

विशेष म्हणजे धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी या वर्षी जानेवारीत घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयामुळे या जोडप्यासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघांनी घटस्फोटाची घोषणा करणारी संयुक्त पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते, ”आम्ही १८ वर्षे मित्र, जोडपे, पालक म्हणून एकमेकांचे शुभचिंतक म्हणून घालवली, पण आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून आम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला एकटे सोडा जेणेकरून आम्ही या स्थितीचा सामना करू शकू.”

या जोडप्याने २००४ मध्ये लग्न केले. ऐश्वर्या आणि धनुषची पहिली भेट एका शोदरम्यान झाली, त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. लग्नाच्या वेळी धनुष २१ वर्षांचा होता आणि ऐश्वर्या २३ वर्षांची होती. या जोडप्याने तामिळ रितीरिवाजांनुसार मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment