Vikram Gokhale Hospitalised : अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

WhatsApp Group

Vikram Gokhale Hospitalised : अग्निपथ, हम दिल दे चुके समान आणि भूल भुलैया यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एएनआयने त्यांच्या ट्विटर हँडलवर ज्येष्ठ अभिनेत्याच्या बिघडलेल्या तब्येतीची माहिती दिली आहे, ज्यामध्ये एजन्सीने म्हटले आहे की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अजुनही गंभीर आहे.

विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि कलाकार होते.

चित्रपट सृष्टीशी जुने  संबंध

विक्रम गोखले यांच्या अनेक पिढ्यांचे चित्रपट सृष्टीशी जुने नाते आहे. त्यांची आजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली भारतीय कलाकार होती आणि त्यांचा आजीने हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते, ज्याचे दिग्दर्शन दादासाहेब फाळके यांनी केले होते, ज्यांना भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

१९७१ मध्ये हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण

विक्रम गोखलेंनी १९७१ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘परवाना’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच अमिताभ बच्चन नकारात्मक भूमिकेत दाखवण्यात आले होते.

हेही वाचा – सांगलीतील ४० गावं कर्नाटकात जाणार? जाणून घ्या काय आहे…

‘या’ चित्रपटांमध्येही महत्त्वाची भूमिका 

परवाना नंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया, मिशन मंगल, दिल से, दे दाना दन, हिचकी, निकम्मा, अग्निपथ, विक्रम बेताल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडे, विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी मराठी, हिंदी चित्रपट तसेच अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे आणि त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a comment