नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘आपल्यासारख्या’ लूकवर अर्चना म्हणते, “माझी तुलना…”

WhatsApp Group

Archana Puran Singh on Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी हा महान अभिनेता आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. नवाजुद्दीन प्रत्येक चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकतो. यावेळी नवाजुद्दीननं आपल्या लूकनं भारी चर्चा निर्माण केली आहे. ‘हड्डी’ या चित्रपटातून समोर आलेल्या नव्या लूकमध्ये त्यानं आपल्या बॉस लेडी अवतारानं सर्वांनाच थक्क केलं आहे. ‘हड्डी’ हा रिव्हेंज ड्रामा असल्याचं म्हटलं जात आहे.

नवाजुद्दीनचा लूक पाहून सगळे दंग

आदल्या दिवशी नवाजुद्दीच्या हड्डी या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता. मुलीच्या लूकमध्ये नवाजुद्दीनला ओळखणंही अवघड आहे. पोस्टरमध्ये नवाजुद्दीन बाईच्या लूकमध्ये दिसत आहे, त्यानं ग्रे कलरचा शिमरी गाऊन घातला आहे. ग्लोइंग बोल्ड मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईलमध्ये नवाजुद्दीनला ओळखणंही अवघड आगे. त्याचे हात रक्तानं माखले आहेत. अनेक लोक नजाजुद्दीनच्या बॉस लेडी लूकची अर्चना पूरण सिंहसोबत तुलना करत आहेत. हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे. नवाजुद्दीन हुबेहुब अर्चना पूरण सिंहसारखा दिसतो, असं अनेकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – भांडण की दुसरं काही? कृष्णा अभिषेकनं का सोडला ‘द कपिल शर्मा शो’?

काय म्हणाली अर्चना?

आता या तुलनेवर स्वत: अर्चना पूरण सिंहनं प्रतिक्रिया दिली आहे. ”हेअरस्टाईल माझ्यासारखी दिसते, म्हणूनच सर्व तुलना होत आहेत. द कपिल शर्मा शोच्या सुरूवातीला, मी साइड पार्ट केलेले केस यासारखे कॅरी करायचे. मी एवढंच म्हणेन की कोणत्याही गोष्टीत माझी नवाजुद्दीन सिद्दीकीशी तुलना करणं ही मोठी गोष्ट आहे”, असं अर्चना म्हणाली

कधी रिलीज होणार हड्डी?

हड्डी चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सध्या हड्डीचं शूटिंग सुरू आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षत अजय शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. अक्षतचा हा डेब्यू चित्रपट आहे. तो यापूर्वी AK vs AK आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या लोकप्रिय प्रकल्पांसह दुसरा युनिट डायरेक्टर होता. ‘मेजर’ या पॅन इंडिया चित्रपटातील संवाद लेखकाचे श्रेय त्यांना देण्यात आलं आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीची भूमिका काय असेल याबाबत अद्याप काहीही समोर आलेलं नाही. ‘हड्डी’चं चित्रीकरण पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात होणार आहे. प्रामुख्याने नोएडा आणि गाझियाबादमध्ये हे चित्रीकरण होईल. या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment