पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार BA ची परीक्षा..! हॉल तिकीटचा PHOTO व्हायरल

WhatsApp Group

PM Modi Photo on Hall Ticket : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील ललित नारायण मिथिला विद्यापीठातून बीएची परीक्षा देणार आहेत, त्यासाठी प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहे. व्हायरल फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल! बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील ललित नारायण मिथिला विद्यापीठात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. विद्यापीठानं परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पूर्णांकापेक्षा जास्त गुण दिले आहेत. यासोबतच पीएम मोदी आणि बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांचा फोटोही बीए परीक्षेसाठी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर लावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या हॉल तिकीटचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक या फोटोवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. विद्यापीठाकडून गैरकारभाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली होती.

हेही वाचा – व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला आणि कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपनीला १ कोटींचा चुना लागला!

विद्यार्थ्याला १५१ गुण मिळाले

विद्यापीठातील गैरकारभाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. इथं एका विद्यार्थ्याला विद्यापीठानं एकूण गुणांपेक्षा जास्त गुण दिले आहेत. १०० गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला १५१ गुण देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्याला धक्काच बसला आहे.

यासोबतच विद्यापीठाने कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या प्रवेशपत्रावर मोदींचा फोटो लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एका विद्यार्थिनीनं विद्यापीठाच्या वेबसाइटवरून हे प्रवेशपत्र डाऊनलोड केलं, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि स्वाक्षरी केलेली होते. यासोबतच राज्यपालांचा फोटो असलेले प्रवेशपत्रही जारी करण्यात आलं आहे.

हेही वाचा – VIDEO : या गावात नावानं नाही, तर शिट्टी वाजवून हाक मारली जाते! वाचा Whistling Village बद्दल..

या चुकीचा ठपका विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थ्यांवर ठेवला आहे. या प्रकरणाला दुजोरा देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मुश्ताक अहमद यांनी ही बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी त्यांच्या वतीने राज्यपाल आणि पंतप्रधानांचा फोटो अपलोड केला आहे. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment