कोण असतात राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड? काय आहे त्यांचा इतिहास? वाचा एका क्लिकवर!

WhatsApp Group

मुंबई : राष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रम असो किंवा प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं निमित्त असो, तुम्ही राष्ट्रपतींना त्यांच्या बॉडीगार्ड म्हणजेच अंगरक्षकांसोबत पाहिलं असेलच. राष्ट्रपतींच्या सुरक्षेत गुंतलेले हे अंगरक्षक अतिशय खास आहेत. राष्ट्रपतीपद हे देशाचं सर्वोच्च पद आहे. त्यांना कमांडर-इन-चीफचा दर्जाही मिळतो. राष्ट्रपतींचे अंगरक्षक नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात. गडद चमकदार रंगाचा गणवेश आणि गॉगल परिधान केलेले हे रक्षक उठावदार दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का की हे अंगरक्षक ठराविक वर्गातूनच निवडले जातात. त्यांचा इतिहास खूप रंजक आहे.

PBG म्हणजे काय?

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना पीबीजी (PBG) म्हणतात. पीबीजी म्हणजे प्रेसिडेंट बॉडीगार्ड. PBGची सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींची सुरक्षा करणं. ही भारतीय लष्कराची घोडदळ रेजिमेंट आहे. हे भारतीय लष्कराचं सर्वात जुनं घोडदळ युनिट आहे आणि एकूणच सर्वात वरिष्ठ युनिट आहे. अनेक निकष पूर्ण केल्यानंतरच त्यांची निवड केली जाते. घोडेस्वारीमध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही.

काय आहे त्यांचा इतिहास?

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा इतिहास सुमारे २५० वर्षांचा आहे. १७७३मध्ये ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगन यांनी बनारसमध्ये ५० घोडदळ सैनिकांना त्याच्या संरक्षणासाठी तयार केलं होतं. त्यावेळी त्यांना ‘मुघल घोडा’ म्हणलं जात असे. १७६० मध्ये सरदार मिर्झा शाहबाज खान आणि सरदार खान तार बेग यांच्याकडे एक खास घोडा होता. त्याला मुघल घोडा असं म्हणत. त्यावेळी बनारसचा राजा चैतसिंग यांनी या तुकडीसाठी ५० घोडदळ सैनिक दिले होते. या तुकडीत १०० सैनिक होते. या युनिटचा सर्वात पहिला कमांडर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कॅप्टन स्वीनी टून होता. १७८४ ते १८५९ पर्यंत याला वर्नर जनरल बॉडी गार्ड (GGBG) असं संबोधलं जात होतं. १९४६मध्ये, ते गव्हर्नर जनरल बॉडी गार्ड म्हणून परत आले. १९४७ मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ही तुकडी दोन भागात विभागली गेली. त्यापैकी एक तुकडी भारतात तर दुसरी पाकिस्तानात राहिली. १९५० पासून त्यांना राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून ओळखलं जातं.

हेही वाचा – राष्ट्रपतींची रॉयल ‘बग्गी’ मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये टॉस झाला होता! जाणून घ्या रंजक इतिहास..

ही तुकडी खास का आहे?

या घोडदळाला ६१ घोडदळ असंही म्हणतात. हे जगातील शेवटच्या घोडदळाच्या अंगरक्षकांपैकी एक आहे. यातील सर्व अंगरक्षक पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षेशिवाय त्यांना परेड आणि इतर प्रसंगीही पाहता येतं. हे रॉयल आर्मीसारखे दिसतात. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलात २२२ लोक (४ अधिकारी, २० JCO आणि १९८ सैनिक) आहेत. हे सैनिक आपली कर्तव्यं कोणत्याही परिस्थीत पूर्ण करतात. ते राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या शपथविधी, प्रजासत्ताक दिन परेड, बीटिंग रिट्रीट, राज्यप्रमुख किंवा इतर देशाचे नेते किंवा गार्ड बदलण्याच्या समारंभात सहभागी झालेले दिसून येतील. या सैन्याचा कमांडिंग ऑफिसर हा नेहमीच ब्रिगेडियर किंवा कर्नल दर्जाचा असतो. त्याच्या खाली मेजर, कॅप्टन, रिसालदार आणि दफादार असतो. शिपायांचा दर्जा ‘नायक’ किंवा ‘सावर’ नावानं ओळखला जातो.

हेही वाचा – रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट कुठं झालं? कुणी केलं? किती तास लागले?

या युनिटमध्ये फक्त राजपूत, जाट आणि शीख यांचा समावेश आहे. जरी सुरुवातीला १७७३ मध्ये जेव्हा हे युनिट तयार झाले, त्यावेळी मुस्लिमांना त्यात प्रवेश देण्यात आला होता. मग या युनिटमध्ये मुस्लिमांसह हिंदू (ब्राह्मण, राजपूत) देखील भरती करण्यात आले. १८९५ नंतर त्यात ब्राह्मणांची भरती बंद झाली. या युनिटमध्ये सहभागी असलेल्या सैनिकांसाठी मूलभूत उंची किमान ६.३ फूट असणं आवश्यक होतं, जी आता ६ फूट करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींचे पहिले अंगरक्षक रेजिमेंटचे कमांडंर लेफ्टनंट कर्नल ठाकूर गोविंद सिंग होते. त्यांचा नायब साहबजादा याकूब खान होता, जो नंतर पीबीजी सैनिकांचा खास बनला. यात जर्मनी देशाच्या खास जातीच्या घोड्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे या उंच घोड्यांचं वजन सुमारे ४५० ते ५०० किलो असतं. फक्त भारतीय सैन्यात या घोड्यांचे केस लांब ठेवले जातात.

Leave a comment