Indian Railways : प्रवाशांसाठी खुशखबर..! इतिहासात असं कधीच घडलं नाही; आता तुम्हाला ‘हे’ सर्व मिळेल!

WhatsApp Group

Indian Railways : तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. अनेकदा रेल्वेने प्रवास करताना प्रवासी खाण्यापिण्याच्या विविधतेबाबत आणि दर्जाबाबत तक्रार करतात. गेल्या काही दिवसांत रेल्वेची उपकंपनी IRCTC कडून गुणवत्तेवर बरेच काम केले जात आहे. आता विविधतेवरही काम केले जात आहे. म्हणजेच आता तुम्हाला समोसे, इडली, ब्रेड बटर, ढोकळा पोहे ते बर्गर इत्यादी सर्व काही रेल्वे प्रवासात मिळेल.

‘ही’ गोष्ट पुन्हा मिळणे सुरू होईल

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेस यांसारख्या प्रिमियम गाड्यांशिवाय इतर गाड्यांमधील जेवण लोकांना आतापर्यंत आवडत नाही. दुसरी अडचण म्हणजे ट्रेनच्या पॅन्ट्री कारमध्ये खाण्यापिण्याच्या मर्यादित वस्तू मिळतात. पण आता लवकरच तुमची ही समस्या संपणार आहे. होय, ट्रेनमध्ये अला कार्टा वस्तू मिळणे पुन्हा सुरू होणार आहे.

हेही वाचा – Calcium Deficiency : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ गंभीर आजार..! ‘अशा’ पद्धतीने दूर करा

मार्च २०२० पर्यंत, कोरोना कालावधीपूर्वी, ब्रेड पकोडा, पनीर पकोडा इत्यादी सर्व प्रकारचे पदार्थ वेगवेगळ्या मार्गांच्या गाड्यांमध्ये पॅन्ट्री कारमध्ये तयार केले जात होते. रेल्वेच्या बाजूने त्याला ए-ला-कार्टे (a-la-carte) आयटम म्हणतात. कोरोनाच्या काळात त्यावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा रेल्वे बोर्डाने या गोष्टीला परवानगी दिली आहे. रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर आयआरसीटीसीने अाला कार्टा आयटमचा मेनू आणि दर यादी जारी केली आहे.

खाद्यपदार्थ आणि त्यांचे दर

चपाती– १० रुपये, कचोरी– १० रुपये, इडली– २० रुपये, २ पीस इडली चटणी/सांभार — २० रुपये, ब्रेड बटर/बटर टोस्ट (२ स्लाईस) — २० रुपये, आलू बोंडा/सुखियां/ कोझुकट्टा (२ नग) — २० रुपये, समोसा (२ नग) — २० रुपये, मेंदू वडा (२ नग) — २० रुपये, गरम / थंड दूध– २० रुपये

मसाला/डाळ वडा (२ नग) — ३० रुपये, रवा/ गहू/ ओट्स/ सेमिया उपमा –३० रुपये, कांदा/रवा उत्तपम –३० रुपये, दही वडा (२ नग) –३० रुपये, ब्रेड पकोडा — ३० रुपये, कांदा/बटाटा/वांगी/भाजी — ३० रुपये,  ढोकळा ३० रुपये, पोहे –३० रुपये, टोमॅटो/व्हेज/चिकन सूप — ३० रुपये, गट्टा सब्जी –३० रुपये, मसाला डोसा –३० रुपये.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment