

Indian Railways Vande Bharat Sleeper Train In Marathi : नवीन वर्षात रेल्वे मंत्रालय देशाला मोठी भेट देणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन (Sleeper Vande Bharat Train) फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन्सची रचना अंतिम करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत या गाड्या तयार होतील आणि या महिन्यात ट्रायलसाठीही तयारी सुरू आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे डिझाईन आणि प्रोटोटाइप तयार झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस स्लीपर कोच तयार होईल. या गाड्यांची चाचणी डिसेंबरमध्येच होईल आणि फेब्रुवारी 2024 पासून ऑपरेशन सुरू होईल.
वंदे भारत स्लीपरमध्ये किती डबे असतील? (Vande Bharat Sleeper Coach)
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper News) मध्ये 20 ते 22 डबे असतील. या ट्रेनचा मार्ग काय असेल आणि ट्रेनचा रंग कोणता असेल, हे अद्याप ठरलेले नाही. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की, प्रवाशांच्या सुविधांची पूर्ण काळजी घेतली जाईल. ते म्हणाले की, वंदे भारत स्लीपरबाबत रेल्वे मिशन मोडमध्ये काम करत आहे.
हेही वाचा – Time Travel Proof : 85 वर्षांच्या जुन्या Video मध्ये सापडला टाइम ट्रॅव्हलचा पुरावा!
वंदे भारत कोण बनवणार? (Sleeper Coach In Vande Bharat)
देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन (Inndias First Sleeper Vande Bharat) ICF चेन्नई (इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई) येथे तयार केली जाईल. ICF सध्याच्या सेमी हायस्पीड वंदे भारत गाड्या तयार करते. वंदे भारत गाड्या तयार करण्यासाठी रेल्वेने रशियाशी हातमिळवणी केली आहे. रशियन कंपनीच्या सहकार्याने 120 वंदे भारत गाड्या तयार करण्याची योजना आहे.
वंदे भारतमधील सुविधा वाढल्या (Vande Bharat Sleeper Train)
वंदे भारत एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये रेल्वेने सुविधा वाढवल्या आहेत. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. रेक्लाइन अँगल आणि सीट कुशन मऊ करण्यात आले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!