नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ‘हे’ 10 बदल होणार! भगवा रंग, मऊ सीट्स आणि…

WhatsApp Group

Vande Bharat Express : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी नवीन वंदे भारतचे फोटो शेअर केले. यात वंदे भारत ही नव्या रंगात दिसत आहे. आतापर्यंत वंदे भारत निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणात होती, पण आता ही ट्रेन केशरी आणि राखाडी रंगात बनवली जात आहे. या वंदे भारतची निर्मिती तिच्या जन्मस्थानी, इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चेन्नई येथेच केली जात आहे. ICF वरिष्ठ पीआरओ व्यंकटेश जीव्ही यांनी याची माहिती दिली. हा रंग चाचणी म्हणून सादर केला गेला आहे आणि रेल्वे बोर्डाच्या परवानगीनंतरच अंतिम केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

नवीन वंदे भारत पुढील वर्षी रुळावर येण्याची अपेक्षा आहे. यात केवळ रंग बदलला जाणार नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, नवीन वंदे भारतमध्ये 10 मोठे बदल केले जात आहेत. यामध्ये दिव्यांगांसाठी उत्तम जागा ते प्रगत सुविधांचा समावेश आहे. हे 10 बदल कोणते आहेत ते जाणून घ्या.

नवीन वंदे भारतमध्ये आसनाचा घसरणारा कोन वाढवण्यात आला आहे. म्हणजेच, ते आणखी मागे वाकले जाऊ शकते जेणेकरुन लोकांना झोप येत असेल तरीही ते खुर्चीवर देखील सहज झोपू शकतात. लांबच्या प्रवासात जास्त त्रास होऊ नये म्हणून सीट्स अधिक मऊ करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – तमिम इक्बालने मागे घेतली रिटायरमेंट! एका रात्रीत काय घडलं? वाचा!

मोबाईल चार्जिंग पॉईंट्सवर प्रवेश सुलभ करण्यात आला आहे. पाय ठेवण्याची जागा आणखी वाढवण्यात आली आहे. स्वच्छता लक्षात घेऊन पाण्याचे थेंब बाहेर पडू नयेत म्हणून वॉश बेसिनची खोली वाढवण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छतागृहांमध्ये रोषणाई वाढवण्यासाठी अधिक चांगले दिवे लावण्यात आले आहेत.

नवीन वंदे भारतमध्ये नवीन सुविधा जोडण्यात आली आहे. अपंगांच्या व्हीलचेअरसाठी कोचमध्ये फिक्सिंग पॉईंट्स दिले जातील. रीडिंग लॅम्प टच रेझिस्टिव्ह टचवरून कॅपेसिटिव्ह टचमध्ये बदलला आहे. कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन वापरणे तुलनेने सोपे आहे. खिडकीचे पडदे सुधारले आहेत. यासोबतच ट्रेनला अधिक सुरक्षित करता यावे यासाठी अँटी क्लायम्बिंग डिव्हाईसही बसवण्यात आले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment