

Kamal Haasan Praises Kantara : रिषभ शेट्टी स्टारर ‘कांतारा’ हा या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे, जो देशभरात धुमाकूळ घालत आहे. लोक चित्रपटातील प्रत्येक दृश्याचे कौतुक करत आहेत आणि याद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा अभिमान वाटू लागला आहे. ३५० कोटींहून अधिकचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाचे अनेक बडे स्टार्स आणि दिग्दर्शकांनी कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टीचे कौतुक केले. तसेच सोनसाखळीसह लॉकेट भेट दिले. आता कमल हसननेही कांतारा पाहून कौतुकाचे पूल बांधले आहेत.
अभिनेता विक्रमने नुकताच १६ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला कांतारा हा चित्रपट पाहिला आणि त्याला प्रेरणादायी चित्रपट म्हटले. इतकेच नाही तर कमल हसनला हा चित्रपट इतका आकर्षक वाटला की त्याने ऱिषभ शेट्टीला फोन केला आणि अशी कथा खूप प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कांताराची स्टोरी लाईन वणव्यासारखी पसरत चालली आहे आणि जो कोणी पाहतो तो त्याची स्तुती करतो आणि चित्रपटगृहात बघायला सांगत असतो. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत आणि अजूनही जागतिक स्तरावर एक हजारपेत्रा स्क्रीनवर चालू आहे. ऑस्ट्रेलिया, यूके, कॅनडा, यूएई आणि यूएसएमध्येही या चित्रपटाने ५० दिवस पूर्ण केले आहेत. लोक थिएटरकडे आकर्षित होत आहेत.
हेही वाचा – FIFA WC 2022 : ओपनिंग सेरेमनी कधी? पहिला सामना कुणात? कुठं पाहता येणार हे सर्व? वाचा इथं!
जर तुम्ही कांतारा च्या OTT रिलीजची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की पुढील आठवड्यात २४ नोव्हेंबर २०२२ रोजी Amazon Prime Video वर प्रीमियर होण्याची शक्यता आहे. रिषभ शेट्टीने या चित्रपटाचे लेखन केले असून तो त्याचे दिग्दर्शक आहे. यात त्याने शिवाची मुख्य भूमिका साकारली आहे, त्यामुळेच त्याच्या टॅलेंटचे सगळेच चाहते झाले आहेत.