

Milind Soman as Field Marshal Sam Manekshaw : बॉलिवूड अभिनेता आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमण अभिनेत्री कंगना रणौत दिग्दर्शित आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. सोमण भारत-पाकिस्तान युद्धाच्या नायक सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून त्यात तो हुबेहुब सॅम माणेकशॉ यांच्यासारखा दिसत आहे. याआधी या चित्रपटातील अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे आणि आता मिलिंदचे नाव समोर आले आहे. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ या भूमिकेसाठी मिलिंदची निवड करण्यात आली आहे.
काय म्हणाला मिलिंद?
या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सॅम माणेकशॉ हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे हिरो होते. मिलिंद सोमण म्हणाला, “फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणे हा खूप मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. या चित्रपटात कंगनासोबत काम करताना मला आनंद झाला आहे. मला तिचे काम आवडले आहे. मी तिच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे.”
हेही वाचा – कमालच..! पोलिसांनी १००व्या वाढदिवशी आजीला केलं अटक; कारण ऐकून चाट पडाल!
कंगना म्हणाली, ”सॅम माणेकशॉ यांची स्पष्ट दृष्टी होती. श्रीमती गांधी आणि सॅम माणेकशॉ या दोन अतिशय बलवान व्यक्तिमत्त्वांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धासाठी एकत्र कसं काम केलं हे चित्रपटात दाखवलं आहे. मला इतिहासाच्या या अध्यायात खूप रस आहे, कारण त्यात गोष्टी कशा घडल्या आणि त्या कशा आखल्या गेल्या याचा शोध घेतला जातो. आम्ही भाग्यवान आहोत की मिलिंद सर ही भूमिका करत आहेत. मला आशा आहे की हा चित्रपट त्याच्या जबरदस्त प्रतिभा आणि तारकीय स्क्रीन उपस्थितीला न्याय देईल.”
या चित्रपटाची निर्मिती रेणू पिट्टी आणि कंगना रणौत यांनी केली आहे. चित्रपटाचे संवाद रितेश शाहचे आहेत, जो यापूर्वी कहानी, पिंक, रेड आणि एअरलिफ्ट सारख्या प्रसिद्ध चित्रपटांशी संबंधित होता. मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. याआधी कंगनासह बाकीच्या स्टार्सचा फर्स्ट लूक समोर आल्यानं या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल ‘भारी’ माहिती…
- भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ यांचे २७ जून २००८ रोजी निधन झाले. ते भारताचे आठवे लष्करप्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं १९७१ मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात ९०००० सैनिकांना कैद करण्यात आले हा ऐतिहासिक रेकॉर्ड आहे.
- त्यांची शानदार लष्करी कारकीर्द ब्रिटिश इंडियन आर्मीपासून सुरू झाली आणि चार दशकं चालली ज्या दरम्यान पाच युद्धे झाली. फील्ड मार्शल पद मिळविणारे ते भारतीय सैन्यातील पहिले अधिकारी होते.
- जेव्हा त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना वडिलांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांनी आपल्या वडिलांविरुद्ध बंड केलं आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दिली. ते १९३२ मध्ये ४० कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीत रुजू झाले.
हेही वाचा – टायरचा रंग काळाच का असतो? पांढरे, हिरवे, निळे असे का नसतात? घ्या जाणून!
- सत्य सांगायला माणेकशॉ कधीच घाबरले नाहीत. जेव्हा इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानवर अकाली हल्ला करण्याचं आवाहन केलं, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की या परिस्थितीत पराभव निश्चित आहे. त्यामुळं इंदिरा गांधी नाराज झाल्या. रागाची पर्वा न करता माणेकशॉ म्हणाले, ‘पंतप्रधान, तुम्ही तोंड उघडण्यापूर्वी मी कोणत्या तरी बहाण्यानं राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं का?’
- सुमारे सात महिन्यांनंतर त्यांनी तयारी पूर्ण केली आणि बांगलादेशचं युद्ध लढले. इंदिरा गांधींनी त्यांना युद्धापूर्वी भारतीय सैन्याच्या तयारीबद्दल विचारले असता त्यांनी उत्तर दिले, ‘मी नेहमीच तयार आहे, स्वीटी.’
- माणेकशॉं यांच्याबद्दलचा एक किस्सा खूप गाजला. १९४२ मध्ये बर्मामध्ये जपानशी लढताना त्यांच्या पायात सात गोळ्या लागल्या होत्या. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मला खेचरानं लाथ मारली आहे.’
- माणेकशॉ यांचा त्यांच्या लष्कराच्या गुरखा रेजिमेंटवर किती विश्वास होता, हे त्यांच्या एका वक्तव्यावरून दिसून येतं. एकदा त्यांनी गोरखा रेजिमेंटचे कौतुक केलं आणि म्हटलं, जर तुम्हाला कोणी सांगितलं की तो मृत्यूला घाबरत नाही, तर तो खोटा आहे किंवा गोरखा आहे.