दिग्गज अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन..! मागे सोडून गेल्या ‘इतकी’ संपत्ती

WhatsApp Group

Veteran Actress Tabassum Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वृत्तानुसार, ७८ वर्षीय तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तबस्सुम हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. १९४४ मध्ये जन्मलेल्या तबस्सुम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. चाहते त्यांना ‘बेबी’ तबस्सुम नावानेही ओळखतात. तबस्सुम दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ या शोसाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्या अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसल्या. रिपोर्ट्सनुसार, तबस्सुम खूप विलासी जीवन जगत होत्या.

नावामागील मनोरंजक कथा

तबस्सुम यांचा जन्म १९४४ मध्ये मुंबईत अयोध्यानाथ सचदेव आणि आई असगरी बेगम यांच्या घरी झाला. तबस्सुम यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. तबस्सुम यांच्या नावामागेही एक रंजक कथा आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या वडिलांनी पत्नीच्या म्हणजेच तबस्सुम यांच्या आईच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन त्यांचे नाव तबस्सुम ठेवले. वडिलांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन आईने तबस्सुम यांचे नाव किरण बाला ठेवले. रिपोर्ट्सनुसार, तबस्सुमच्या लग्नापूर्वीच्या पेपर्समध्ये तिचे नाव किरण बाला सचदेव होते.

हेही वाचा – NZ Vs IND 2nd T20 : न्यूझीलंडनं जिंकला टॉस..! ‘हे’ दोघेजण भारताच्या Playing 11 मधून बाहेर

रिपोर्ट्सनुसार, तबस्सुम यांची गणना इंडस्ट्रीतील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये होते. त्यांनी राजेशाही पद्धतीने आयुष्य जगले. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सांताक्रूझमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले जाईल.

Leave a comment