Mouni Roy Net Worth : मौनी रॉय किती कोटींची मालक? जाणून घ्या अभिनेत्रीच्या कमाईबद्दल

WhatsApp Group

Mouni Roy Net Worth : आजच्या काळात मौनी रॉय ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. मौनी रॉयने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. टीव्ही शो ‘नागिन’मध्ये ‘शिवान्या’च्या भूमिकेने रातोरात प्रसिद्ध झालेल्या मौनी रॉयचे नाव टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत श्रीमंत अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. मौनी रॉयच्या एकूण संपत्ती बद्दल जाणून घेऊया.

मौनी रॉयचे उत्पन्नाचे स्रोत

मौनी रॉयच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे तिचे टीव्ही शो आणि चित्रपट. चित्रपट आणि शोमध्ये काम करून अभिनेत्री चांगली कमाई करते. मौनी रॉय तिच्या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी लाखो रुपये घेते. यासोबतच अभिनेत्री अनेक मोठ्या ब्रँड्सचे प्रमोशन करून भरघोस कमाईही करते. सेलिब्रिटी वर्थच्या अहवालानुसार मौनी रॉयची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये आहे.

हेही वाचा – तुम्ही कधी विचार केलाय…हॉटेलमध्ये नेहमी पांढऱ्या बेडशीट्स का वापरतात?

आलिशान घराची मालकीण 

मौनी रॉयचे मुंबईत स्वतःचे एक अतिशय आलिशान घर आहे, ज्यामध्ये ती तिचे जीवन अतिशय आरामात जगते. अभिनेत्रीच्या घरात तिच्या आराम आणि गरजांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे आणि तिच्या घराची बाल्कनीमधून सुंदर व्हिव्यू दिसतो. मौनी रॉयच्या या घराची किंमत २५ कोटी आहे.

मौनी रॉयचे कार कलेक्शन 

या आलिशान घरासोबतच मौनी रॉयकडे ८८.१८ लाख किमतीच्या मर्सिडीज जीएलएस ३५०डी आणि ७० लाख किमतीच्या मर्सिडीज-बेंझ ई-क्लास सारख्या अनेक उत्तम गाड्या आहेत. यासोबतच मौनी रॉय इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो अपलोड करत असते.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment