कर्करोगावर आता सुपरहिट व्हॅक्सिन? उंदरांमध्ये ८०% ट्यूमर गायब!

WhatsApp Group

Cancer Super Vaccine : कर्करोगावर अजूनपर्यंत अशी कोणतीही लस तयार झालेली नाही जी या भयंकर आजाराचा उद्रेकच थांबवेल. पण आता त्या दिशेने एक मोठी झेप घेतली गेली आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स अ‍ॅमहर्स्ट येथील संशोधकांनी अशी “सुपर कर्करोग लस” विकसित केली आहे, जी भविष्यात कर्करोग होण्यापूर्वीच शरीराला त्याविरुद्ध सज्ज करू शकते.

ही क्रांतिकारी लस सध्या एक्सपेरिमेंट स्टेज मध्ये आहे आणि तिचे प्राथमिक परिणाम जगभरातील वैज्ञानिकांना थक्क करणारे ठरले आहेत. या संशोधनाचा अहवाल 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या Cell Reports Medicine या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

कशी काम करते ही सुपर व्हॅक्सिन?

ही लस नॅनोपार्टिकल्सवर आधारित आहे — म्हणजे अतिशय सूक्ष्म अशा कणांवर. हे नॅनोकण शरीरातील पेशींना थेट लक्ष्य करू शकतात. या लसीत हे कण अ‍ॅन्टिजन आणि इम्यून-बूस्टिंग घटकांसोबत जोडले जातात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक तीव्र व प्रभावी होते.

अ‍ॅन्टिजन हे असे घटक असतात जे शरीराला “ही पेशी धोकादायक आहे” हे सांगतात. त्यामुळे रोगप्रतिकारक प्रणाली त्या धोकादायक पेशीवर लगेच हल्ला करते.

प्रयोगात आश्चर्यकारक परिणाम

संशोधकांनी ही लस प्रथम उंदरांवर वापरली. मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) पेप्टाइड्ससोबत नॅनोपार्टिकल्स मिसळून लस तयार करण्यात आली. ती देताच उंदरांच्या T-सेल्स (श्वेत रक्तपेशी) सक्रिय झाल्या आणि त्यांनी कर्करोगी पेशी ओळखून नष्ट करण्यास सुरुवात केली.

तीन आठवड्यांनंतर जेव्हा त्या उंदरांना मेलेनोमा कॅन्सरच्या पेशींशी संपर्कात आणले, तेव्हा 80% उंदरांमध्ये ट्यूमरच निर्माण झाला नाही! एवढेच नाही तर हे उंदीर संपूर्ण आठ महिने निरोगी राहिले. त्याउलट ज्यांना लस दिली नव्हती ते 35 दिवसांत मृत्यूमुखी पडले.

दुसऱ्या टप्प्यात अजून प्रभावी परिणाम

प्रत्येक कर्करोगासाठी स्वतंत्र अ‍ॅन्टिजन तयार करणे कठीण असल्याने संशोधकांनी दुसऱ्या प्रकारची लस बनवली — ट्यूमर लाइसेट वापरून. म्हणजेच मरण पावलेल्या कर्करोग पेशींचे मिश्रण. हे शरीराला “कर्करोग ओळखायला” शिकवते.

हेही वाचा – जॉन्सन अँड जॉन्सनवर ब्रिटनमध्ये तब्बल 10 हजार कोटींचा दावा! बेबी पावडरमुळे खरंच कॅन्सर होतो का

या लसीच्या प्रयोगात जे उंदीर पॅन्क्रिएटिक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि मेलेनोमाच्या पेशींशी संपर्कात आले, त्यांच्यात खालील परिणाम दिसले:

  • 88% उंदीरांमध्ये पॅन्क्रिएटिक कॅन्सर ट्यूमर नाहीसा झाला
  • 75% उंदीरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर ट्यूमर झाला नाही
  • 69% उंदीरांमध्ये मेलेनोमा ट्यूमर निर्माणच झाला नाही

आशेचा किरण

या सुपर व्हॅक्सिनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त ट्यूमर होण्यापासूनच थांबत नाही, तर तो शरीरात इतर अवयवांपर्यंत पसरू नये हेही सुनिश्चित करते.

सध्या ही लस मानवी शरीरावर चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. पण प्राण्यांवरील परिणामांवरून असे दिसते की कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही सुपर लस गेमचेंजर ठरू शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment