Twinkle Khanna First Job : ट्विंकल खन्ना विकायची मासे आणि कोळंबी! अक्षय कुमारच्या पत्नीचा तिच्या पहिल्या जॉबबद्दल खुलासा

WhatsApp Group

Twinkle Khanna First Job : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या फिल्मी जगापासून दूर आहे. पण या ना त्या कारणाने ट्विंकल खन्ना सतत लाइमलाइटचा भाग असते. अलीकडेच, बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने तिच्या पहिल्या कामाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ट्विंकल खन्नाने सांगितले की, त्या काळात ती मासे आणि कोळंबी विकायची.

ट्विंकल खन्ना मासे विकायची

अलीकडेच ट्विंकल खन्नाने हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि कॉमेडियन जॉनी लीव्हरसोबत ट्वीक इंडियावर खुलेपणाने संवाद साधला आहे. यादरम्यान ट्विंकल खन्नाने तिच्या पहिल्या कामाबद्दल खुलासा केला आहे. ट्विंकल खन्ना म्हणाली- ‘त्यावेळी ती एका मासे विकणाऱ्या कंपनीत काम करायची, जी तिच्या आजीची बहीण चालवत होती. या कंपनीचे नाव होते मच्छीवाला. जिथे ट्विंकल मासे आणि कोळंबी पोचवण्याचे काम करायची. 

ट्विंकल पुढे म्हणाली ‘मला अजूनही आठवते की, त्या वेळी लोक त्यांच्या नोकरीबद्दल सांगायचे तेव्हा लोक मला म्हणायचे की तू काय मच्छीमार करणारी  आहेस ?.’ याशिवाय जॉनी लीव्हर यांनी पण यांच्या पहिल्या कामाबद्दल सांगितले की, ‘तेही संघर्षाच्या दिवसांत रस्त्यावर पेन विकायचे. यासोबतच ते चित्रपटातील कलाकारांची मिमिक्रीही करत असे.

हेही वाचा – 50 Years Of Zanjeer : पत्नीचे दागिने गहाण ठेवून प्रकाश मेहरा यांनी बनवला ‘जंजीर’, फ्लॉप…

या चित्रपटांमध्ये ट्विंकल खन्नाने काम केले आहे

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत लग्नानंतर ट्विंकल खन्ना मोठ्या पडद्यापासून दुरावली. दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी असल्याने, ट्विंकल खन्ना चित्रपटांमध्ये दिसणे निश्चितच होते. ट्विंकल खन्नाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ‘बरसात, मेला, जान, बादशाह, इंटरनॅशनल खिलाडी, जब प्यार किसी से होता है, इतिहास आणि जोरू का गुलाम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a comment