PHOTOS : वातावरण टाईट..! जान्हवी कपूरचं ‘व्हिटामिन C’ पाहिलं का?

WhatsApp Group

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यामध्ये तिनं आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर जान्हवी तिचा हॉट अवतार दाखवण्यातही मागं नाही. ती अनेकदा तिच्या सिझलिंग फोटोशूटचे फोटो शेअर करते आणि पुन्हा एकदा जान्हवीनं असंच काही केले आहे. जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती डीप नेक ऑरेंज कलरच्या शॉट ड्रेसमध्ये तिचा बोल्डनेस दाखवत आहे. या सर्व फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे, तिनं केशरी रंगाच्या शॉट ड्रेससह हेअर पोनी बनवली आहे, ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

हेही वाचा – बाबा माझ्या..! महिलेच्या डोळ्यातून आणि नाकातून काढल्या १४५ अळ्या, भारतातील घटना!

या फोटोंसोबत जान्हवी कपूरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ”व्हिटॅमिन सी या लेटर.” जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होत आहेत. अवघ्या ४५ मिनिटांत या फोटोंना ३ लाख ७७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
जान्हवी नुकतीच ‘गुडलक जेरी’ चित्रपटात दिसली. या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती. जान्हवीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याचवेळी, तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना, ती लवकरच ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे. २०२३ मध्ये ती वरुण धवनसोबत ‘बावल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment