

Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज 25 मे रोजी महाराष्ट्र HSC म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला. मुलांपेक्षा मुलींचा निकाल चांगला लागला आहे. उमेदवारांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर त्यांचा निकाल पाहता येईल.
अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, महाराष्ट्र बारावीचा निकाल mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in वर देखील पाहता येईल. यावर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थी 12वी बोर्डाच्या परीक्षेत बसले आहेत, ज्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे.
मुलांपेक्षा मुलींचा निकाल चांगला लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.73 तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89.14 इतकी आहे. एकूण 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
हेही वाचा – Medicine : आता गोळ्यांचं पूर्ण पाकिट खरेदी करण्याची गरज नाही, सरकार घेणार ‘असा’ निर्णय!
जिल्हावार उत्तीर्ण टक्केवारी
- कोकण – 96.01
- पुणे – 93.34
- कोल्हापूर – 93.28
- अमरावती – 92.75
- औरंगाबाद – 91.85
- नाशिक – 91.66
- लातूर – 90.37
- नागपूर – 90.35
- मुंबई – 88.13
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!