उज्ज्वला योजनेचा नवा टप्पा! २५ लाख महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन; घरीच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp Group

Ujjwala Yojana 2025 : GST नंतर आता भारत सरकारने गरीब महिलांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत आता 25 लाख गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिलं जाणार आहे.

या निर्णयामुळे देशातील करोडो महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि सुरक्षित इंधन मिळणार आहे. याआधी 10.58 कोटींहून अधिक लोकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिलं गेलं असून, 2021 नंतर या योजनेच्या अंमलबजावणीत आणखी गती आली आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करताना खालील महत्त्वाचे कागदपत्रे आवश्यक असतील:

  • लाभार्थी महिलेचा आधार कार्ड (ई-केवायसी आवश्यक)
  • BPL राशन कार्ड / गरीबी रेषेखालील प्रमाणपत्र
  • बँक पासबुक किंवा खाते क्रमांक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र (उदा. राशन कार्ड, मतदार ओळखपत्र)

हेही वाचा – एक मिनिट उशीर झाला असता तर काय झालं असतं? धडकी भरवणारा व्हिडिओ!

ऑनलाईन अर्ज कसा कराल? (Ujjwala Yojana 2.0 Application Process)

  1. सर्वप्रथम तुमच्या एलपीजी कंपनीची (जसे Indane, Bharat Gas, HP) अधिकृत वेबसाइट उघडा.
  2. ‘New Ujjwala Yojana 2.0’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. अर्ज फॉर्म उघडल्यानंतर त्यामध्ये तुमची सर्व माहिती भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करून त्याची PDF डाउनलोड करा.
  6. ही PDF आणि मूळ कागदपत्रांची छायाप्रत नजीकच्या गॅस डीलरकडे जमा करा.
  7. 10-15 दिवसांत तुमच्या घरी मोफत गॅस चूल व सिलेंडर इंस्टॉल केला जाईल.

ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्या आणि उज्ज्वला योजनेचा अर्ज फॉर्म मागवा.
  2. फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक डिटेल्स, BPL कार्ड माहिती भरावी.
  3. सर्व कागदपत्रांसह अर्ज एजन्सीमध्ये जमा करा.
  4. वेरिफिकेशननंतर तुमचं मोफत एलपीजी कनेक्शन घरी दिलं जाईल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment