अमोल मुझुमदार : भारतासाठी एकही मॅच खेळला नाही, तरीही ‘वर्ल्डकप’च्या फायनलपर्यंत जाणारा कोच!

WhatsApp Group

Amol Muzumdar : भारतीय क्रिकेटमध्ये प्रकाशझोत बहुतेक वेळा चमकदार खेळाडूंवर किंवा जाहीर वक्तव्य करणाऱ्या प्रशिक्षकांवरच पडतो. पण कधी कधी शांततेत चालणारे बदलही इतिहास घडवतात. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार हे त्याचे सर्वात सुंदर उदाहरण.

ऑक्टोबर 2023 मध्ये जबाबदारी स्वीकारताना महिला संघ संभ्रमात होता. निवड प्रक्रियेपासून नेतृत्वापर्यंत प्रश्नच प्रश्न होते. विशेष म्हणजे मुझुमदार यांनी कधीही भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

पण आज परिस्थिती बदलली आहे. भारत महिला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत उभा आहे आणि या शांत, स्थिर, आत्मविश्वासू कोचने अप्रतिम नेतृत्व सिद्ध केले आहे.

11 हजार पेक्षा जास्त धावा, पण भारतासाठी एकही सामना नाही

अमोल मुझुमदार, मुंबईचा हा महान फलंदाज… 2 दशकांचा First-Class प्रवास… 11,000+ धावा… पण क्रिकेट नियतीने त्यांना निळी जर्सी दिला नाही. तरीही ते कधी तक्रार करणारे नव्हते, कधी गाजावाजा करणारे नव्हते.

त्यांनी धडाडीपेक्षा मनाची समज व संवाद यांना महत्त्व देत दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, भारतीय ज्युनियर संघात कोचिंग करत शांतपणे आपला मार्ग तयार केला.

शब्दांपेक्षा विश्वास

वर्ल्डकपच्या गटपातळीतील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पराभव झाला तेव्हा टीका सुरू झाली. ‘अनुभव नाही’, ‘शांत स्वभावाने चालत नाही’ अनेक आवाज उठले. सेमीफायनलपूर्वी त्यांनी फक्त एक वाक्य बोर्डावर लिहिले, “आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त एक धाव जास्त करायची आहे.”

ना मोठी भाषणे… ना चित्तथरारक घोषणा… फक्त शांत, स्पष्ट ध्येय. आणि भारताने ऑस्ट्रेलियासारख्या अजेय संघाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली.

कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “सर जे बोलतात, मनापासून बोलतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो.”

युवा खेळाडूंवर विश्वास

क्रांती गौड आणि श्री चरनीसारख्या तरुणींवर मोठ्या मंचावर विश्वास ठेवणे धाडसाचे होते. पण मुझुमदारांना अनुभवापेक्षा क्षमता आणि मनाची तयारी महत्त्वाची वाटली. त्यांनी जेमिमाला न्यूझीलंडविरुद्ध क्रमांक तीनवर अचानक पाठवून सामना बदलला. शांत निरीक्षण, योग्य वेळी योग्य निर्णय, हे त्यांचे खास वैशिष्ट्य.

संघात सकारात्मकता, स्पष्टता आणि आपुलकी

इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर संघाने लगेच Energy वाढवून सराव केला. मुझुमदार म्हणाले, “कधी अपयश नसते, फक्त शिकवण असते.” आज भारत अंतिम फेरीत आहे. मैदानात कधी न उतरलेला हा कोच आता चॅम्पियन प्रशिक्षक होण्याच्या एक पावलावर.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment