अर्जुन तेंडुलकरचा गुपचुप झाला साखरपुडा? कोण आहे सचिनची सून?

WhatsApp Group

Arjun Tendulkar Engagement News : दिग्गज भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता नव्या जीवन प्रवासाला सुरुवात करणार असल्याचे वृत्त आहे. इंडियाटुडेच्या वृत्तानुसार, अर्जुनने मुंबईतील उद्योगजगतामधील नावाजलेली व्यावसायिक घराण्यातील कन्या सानिया चंडोक हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

सानिया चंडोक या रवी घई यांची नात असून, घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि खाद्य उद्योगात प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल तसेच लोकप्रिय आइसक्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरी चे मालकी हक्क आहेत.

साखरपुडा खासगी समारंभात

वृत्तानुसार, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खासगी कार्यक्रमात पार पडला, ज्यामध्ये केवळ निकटचे मित्र आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मात्र, अद्याप तेंडुलकर किंवा घई कुटुंबाने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

अर्जुन तेंडुलकरचा क्रिकेट प्रवास

25 वर्षीय अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि ऑलराउंडर आहे. सध्या तो गोवा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स चे प्रतिनिधित्व करतो.

हेही वाचा – HDFC बँकेचा निर्णय! आता सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवावा लागणार ‘इतका’ बॅलन्स, नियम मोडल्यास मोठा दंड!

  • 2020/21 हंगामात त्याने मुंबई संघाकडून पदार्पण केले आणि हरियाणाविरुद्ध टी-20 सामन्यात पहिला सामना खेळला.
  • जूनियर स्तरावर मुंबईचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याला भारत अंडर-19 संघात स्थान मिळाले.
  • 2022/23 हंगामात तो गोव्याकडे गेला आणि तेथे प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

लाल चेंडू क्रिकेट :

  • 17 सामने
  • 532 धावा (1 शतक, 2 अर्धशतके)
  • 37 विकेट (1 पाच विकेट, 2 चार विकेट)

लिस्ट ए क्रिकेट (गोवा) :

  • 17 सामने
  • 76 धावा
  • गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी

आयपीएल (मुंबई इंडियन्स) :

  • 5 सामने
  • 73 चेंडूत 3 विकेट
  • सर्वोत्तम गोलंदाजी: 1/9
  • इकॉनॉमी रेट: 9.36, स्ट्राईक रेट: 24.3

चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून आधीपासूनच चर्चेत असलेला अर्जुन आता वैयक्तिक आयुष्यातील नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आता सर्वांना त्याच्या लग्नाच्या तारखेची उत्सुकता लागली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment