

Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो कदाचित आशिया कप सुपर-4 टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी खेळणार आहे. आशिया चषक 2023 मध्ये भारताचा पुढील सामना नेपाळशी आहे, जो सोमवारी खेळला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे परंतु वैयक्तिक कारणांमुळे तो सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्धच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. मात्र, वृत्तानुसार तो भारताच्या सुपर-4 टप्प्यातील सामन्यांमध्ये पुनरागमन करेल. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार बुमराहच्या घरी नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
हेही वाचा – SBI Recruitment 2023 : स्टेट बँकेत 6000 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी खेळवण्यात आलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. जसप्रीत बुमराहला या सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्याने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवले. त्याने 14 चेंडूत 16 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. बुमराहच्या बळावर भारताला 266 धावांपर्यंत मजल मारता आली.
जसप्रीत बुमराह गेल्या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघात कर्णधार म्हणून परतला होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे तो जवळपास 11 महिने क्रिकेटपासून दूर होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!