

Asia Cup 2025 Mohsin Naqvi Controversy : 2025 च्या एशिया कप ट्रॉफी वितरण सोहळ्यात एक विचित्र आणि लाजीरवाणी घटना घडली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी असा आरोप केला आहे की त्यांना ट्रॉफी घेऊन स्टेजवर “कार्टूनसारखे” उभं रहावं लागलं, कारण भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला!
काय घडलं नेमकं?
30 सप्टेंबर रोजी Asian Cricket Council (ACC) च्या वर्चुअल मीटिंगमध्ये बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबी (PCB) दरम्यान जबरदस्त चर्चा झाली. भारताने एशिया कप जिंकल्यानंतर देखील भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव व अन्य खेळाडूंनी ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
Interior Minister of Pakistan Mohsin Naqvi was on stage to present Asia Cup Trophy to Team India.
— Incognito (@Incognito_qfs) September 28, 2025
And Indian Team players were busy on their phones. Ignored him so hard. This is brutal. 😂😂😂 pic.twitter.com/8jDT1Vq11k
त्यामुळे मोहसिन नकवी स्टेजवर विनिंग मेडल्स आणि ट्रॉफी घेऊन वाट पाहत राहिले. मात्र कोणीच ट्रॉफी घेण्यासाठी आला नाही. अखेर नकवी मंचावरून खाली उतरले आणि ट्रॉफी घेऊन थेट त्यांच्या हॉटेलवर गेले.
नकवी यांचा संताप का?
PTI च्या अहवालानुसार नकवी यांना वाटले की, ACC चा प्रमुख असूनसुद्धा त्यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “मी स्टेजवर कार्टूनसारखा उभा होतो आणि कोणीही ट्रॉफी घ्यायला आलं नाही!”
BCCI ची कडक भूमिका
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी या वादावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही वैध विजेते आहोत. ट्रॉफी आमच्याचकडे यायला हवी.” त्यांनी ट्रॉफी दुबईतील ACC कार्यालयात ठेवण्याची सूचना केली, जेथून नंतर ती भारतात आणून खेळाडूंना दिली जाईल. वाद इतका वाढला की BCCI कडून ICC कडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला. याच बैठकीदरम्यान आशिष शेलार मध्येच उठून निघून गेले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा