पाच चेंडू, पाच विकेट्स! आयरिश खेळाडूने क्रिकेटमध्ये घडवला अशक्य वाटणारा इतिहास! पाहा Video

WhatsApp Group

Curtis Campher 5 Wickets In 5 Balls : टी-20 क्रिकेट म्हणजे जलदगतीचा खेळ, जिथे सामान्यतः फलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळतो. पण जेव्हा एखादा गोलंदाज पाच चेंडूंमध्ये सलग पाच विकेट घेतो, तेव्हा तो इतिहास घडवतो! आणि हा इतिहास घडवला आहे आयरिश अष्टपैलू खेळाडू कर्टिस कैम्फर याने.

क्रिकेट जगतात खळबळ

इंटर-प्रोविंशियल टी-20 ट्रॉफीच्या सामन्यात मुंस्टर रेड्स विरुद्ध नॉर्थ वेस्ट वॉरियर्स सामन्यात, कैम्फरने विक्रमी कामगिरी करताना पाच चेंडूंवर पाच गडी बाद केले आणि क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली.

पहिल्यांदा १२व्या षटकात जेरड विल्सन आणि ग्राहम ह्यूम यांना बाद करत, त्यानंतर १४व्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर हॅट्रिक घेतली — अँडी मॅकब्राइन, रॉबी मिलर आणि जोश विल्सन यांना बाद केलं.

क्रिकेट इतिहासात लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांनी सलग चार चेंडूंवर चार गडी बाद केले होते, पण कर्टिस कैम्फरने यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन पाच चेंडूंवर पाच विकेट्स घेतल्या, आणि ‘डबल हॅट्रिक’पलीकडचा एक नवीन इतिहास रचला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment