अश्लील ऑडिओ क्लिप, टॅक्स चोरी, इंग्लंडचा दिग्गज कर्णधार बेपत्ता!  

WhatsApp Group

Paul Collingwood Controversy : अ‍ॅशेस मालिकेची उलटगणती सुरू झाली असताना इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठा भूकंप आला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित अ‍ॅशेस सिरीज 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण त्याआधीच इंग्लंडच्या संघातील आणि कोचिंग स्टाफमधील हालचालींनी क्रिकेट विश्वात खळबळ उडवली आहे.

इंग्लंडचा सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड, जो संघाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, तो अचानक “खासगी कारणांमुळे” गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. कॉलिंगवूडला शेवटच्यांदा डिसेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान संघासोबत पाहण्यात आले होते. त्यानंतर तो पुन्हा कधीच सार्वजनिकपणे दिसला नाही.

डेली मेलच्या अहवालानुसार, इंग्लंडच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला आता अ‍ॅशेस मालिकेसाठी ‘बॅकरूम स्टाफ’मध्ये स्थान मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण मागील काही महिन्यांत त्याचं नाव अनेक वादांमध्ये अडकलं आहे – लीक झालेले टेप्स, वैयक्तिक नात्यांबद्दलच्या अफवा आणि करचुकवेगिरीचे आरोप यामुळे त्याचं करिअर धोक्यात आलं आहे.

लीक झालेले टेप्स आणि फोटो

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची तात्पुरता मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर केवळ 56 दिवसांत, बारबाडोसच्या समुद्रकिनारी एका महिलेला चुंबन घेतानाचा त्याचा फोटो समोर आला. या घटनेदरम्यान इंग्लंड संघाला निर्णायक तिसऱ्या कसोटीत 10 विकेटने पराभव पत्करावा लागला होता.

यानंतर एप्रिल 2023 मध्ये त्याचा सहकारी क्रिकेटर ग्रीम स्वानने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, कॉलिंगवूडशी संबंधित एक अश्लील ऑडिओ क्लिप क्रिकेट जगतात फिरत आहे. त्या क्लिपमध्ये त्याचं नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले असल्याचा दावा करण्यात आला. तथापि, ही क्लिप कधी आणि कुठे रेकॉर्ड करण्यात आली होती याबद्दल कोणतीही खात्रीलायक माहिती नाही.

2007 मधील स्ट्रिप क्लब प्रकरण

कॉलिंगवूडचा वादांशी जुना संबंध आहे. 2007 च्या टी20 विश्वचषकादरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून मैदानात उतरायच्या आदल्या दिवशी, तो केपटाउनमधील “मॅव्हरिक्स” स्ट्रिप क्लबमध्ये दिसला होता. या कृत्यासाठी त्याच्यावर £1,000 (सुमारे 1 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला होता, मात्र तो प्रकरण त्यानंतर मिटवण्यात आले.

करचुकवेगिरीचा आरोप आणि £196,000 दंड

पॉल कॉलिंगवूडच्या अडचणींमध्ये अजून भर पडली आहे. अलीकडेच एचएम रेव्हेन्यू अँड कस्टम्स (HMRC) ने त्याच्यावर मोठा आर्थिक दंड लावला आहे. त्याच्यावर £196,000 (सुमारे 2 कोटी रुपये) इतकी रक्कम कररूपाने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही रक्कम त्याच्या PDC Rights Ltd. या खासगी कंपनीद्वारे केलेल्या कर व्यवहारांशी संबंधित आहे, ज्याद्वारे त्याने स्पॉन्सरशिप डीलमधून मिळालेल्या उत्पन्नावरील कर टाळण्याचा प्रयत्न केला होता. कॉलिंगवूडने याविरोधात केलेली अपील देखील फेटाळण्यात आली असून, आता त्याला ही संपूर्ण रक्कम भरणे भाग पडणार आहे.

अहवालानुसार, इंग्लंडचा जिंबाब्वेविरुद्धचा सामनादरम्यान कॉलिंगवूड लंडनमध्येच होता – आणि तो आपले करसंबंधित प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्नशील होता.

अ‍ॅशेसपूर्वी इंग्लंडसाठी संकट!

या सर्व घटनांमुळे अ‍ॅशेसपूर्वीच इंग्लंडच्या संघात गोंधळ माजला आहे. पॉल कॉलिंगवूडच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या तयारीवर परिणाम होणार का, हा आता चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment