Shantha Rangaswamy On Harmanpreet Kaur : महिला वनडे वर्ल्डकप 2025 जिंकत भारताने क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. भारताच्या या अभूतपूर्व विजयानंतर संपूर्ण देश जल्लोषात आहे. मात्र या ऐतिहासिक यशानंतरही भारतीय महिला क्रिकेटमधील नेतृत्वाबाबत मोठी चर्चा पेटली आहे. भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी सध्याच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांना कर्णधार पद सोडण्याचा सल्ला दिला आहे.
रंगास्वामींचे मत स्पष्ट आहे, “हरमनप्रीत संघासाठी अतिशय मौल्यवान आहे. बॅटर म्हणून, फिल्डर म्हणून तिचे योगदान अमूल्य आहे. पण काहीवेळा टॅक्टिकल चुका होतात. कर्णधारपदाचा भार कमी झाला तर ती आणखी चांगली कामगिरी करू शकते.”
“ओझं नसलं, तर हरमनप्रीत आणखी धडाकेबाज होईल”
रंगास्वामींच्या मते, हरमनप्रीत कौर पुढील तीन ते चार वर्षे भारतासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते. परंतु तिच्या खांद्यावरील नेतृत्वाचा ताण कमी करणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे सांगितले, “या यशानंतर हा निर्णय कठीण वाटू शकतो, पण भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी आणि हरमनप्रीतसाठी हे गरजेचे आहे.”
#WomensWorldCup2025
— Express Sports (@IExpressSports) November 3, 2025
Former India skipper wants Harmanpreet Kaur to pass on captaincy baton to Smriti Mandhana: ‘It’s overdue’https://t.co/G0zf7fMghk
पुढील कर्णधार कोण? स्मृती मंधाना योग्य पर्याय!
रंगास्वामींनी स्पष्टपणे म्हटले की स्मृती मंधाना ही भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्यातील कर्णधार होण्यासाठी सर्वात योग्य पर्याय आहे. “स्मृती 29 वर्षांची आहे. तिच्यात नेतृत्वगुण आहेत. तिला सर्व फॉर्मॅट्समध्ये कर्णधार बनवण्याची योग्य वेळ आली आहे.”
रोहित शर्माचा संदर्भ
रंगास्वामी म्हणाल्या की पुरुष संघातही भविष्यातील विचार करून सेलेक्टर्सनी बदल केले. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही नेतृत्व बदलले गेले होते.
टीमची कमकुवत बाजू – गोलंदाजीवर भर द्यावा
भारताच्या भव्य विजयाबाबत आनंद व्यक्त करताना रंगास्वामींनी संघाची काही कमकुवत बाजूही अधोरेखित केली. “भारताची फलंदाजी भक्कम आहे. पण गोलंदाजी अद्याप चिंता आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांची गोलंदाजी काही प्रसंगी अधिक प्रभावी दिसली. ऑस्ट्रेलियालाही गोलंदाजीच्या कमतरतेमुळे त्रास झाला.”
या विजयामुळे मुलींची नवी पिढी क्रिकेटकडे वळेल
त्यांनी भाकीत केले, “2017 साली उपांत्य फेरी गाठल्यानंतर महिलांच्या क्रिकेटची लोकप्रियता वाढली. पण या विश्वविजयानंतर देशात लाखो मुली क्रिकेटमध्ये येतील. 10 वर्षांत याचा अफाट परिणाम दिसेल.” तसेच त्यांनी माजी मुख्य निवडकर्त्या नीतू डेविड व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा