VIDEO : रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड, पत्नी रितिका पाहतच बसली!

WhatsApp Group

Rohit Sharma Clean Bowled vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या वानखेडेवरील सामन्यात (IND vs SL World Cup 2023) भारताचा कप्तान रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत दिमाखात खेळणाऱ्या रोहितला केवळ 4 धावा करता आल्या. डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दिलशान मदुशंकाच्या धोकादायक चेंडूवर रोहित क्लीन बोल्ड झाला. या चेंडूचे रोहितकडेही उत्तर नव्हते. जेव्हा रोहित बाद झाला, तेव्हा प्रेक्षक गॅलरीत बसलेली त्याची पत्नी खूप निराश झाली. रितिका सजदेहचा दु:खी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रितिका रोहितला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये येत असते. पण आज त्याच्या घरच्या मैदानावर रोहितची बॅट शांत राहिली. मधुशंकाने असा चेंडू टाकला होता ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हा धोकादायक चेंडू पाहून खुद्द गोलंदाजही चकित झाला. आऊट झाल्यानंतर रोहित निराश होऊन पॅव्हेलियनकडे परतला.

हेही वाचा – महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना खुशखबर, दिवाळीत मानधनवाढीसह ‘इतका’ बोनस!

IND vs SL : पाहा रोहित शर्माची विकेट!

या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला आणि पहिल्याच षटकात रोहितला बाद करून श्रीलंकेने सामन्यावर ताबा मिळवला. लंकेच्या वेगवान गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत भारतासमोर भीतीदायक वातावरण निर्माण केले. शुबमन गिल आणि विराट कोहली यांना पहिल्या पॉवरप्लेमध्ये एक-एक जीवदान मिळाले आहे. श्रीलंकेसाठी हा सामना करा किंवा मरो असा आहे. श्रीलंकाने आजचा सामना हरला तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते बाहेर होतील.

याशिवाय आजचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. या विश्वचषकात भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment