मदुशंकामुळे वानखेडेवर भयाण शांतता, मुंबईच्या खेळाडूची जबरदस्त बॅटिंग!

WhatsApp Group

IND vs SL World Cup 2023 India Batting Innings : वानखेडेवर आज वर्ल्डकपचा 33वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगत आहे. या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 358 धावांचे आव्हान दिले आहे. लंककेडून दिलशान मदुशंकाने भारताचा अर्धा संघ गारद केला.

भारताचा डाव

या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत दिमाखात खेळणाऱ्या रोहितला केवळ 4 धावा करता आल्या. डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चेंडूवर रोहित क्लीन बोल्ड झाला. वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाच्या धोकादायक चेंडूचे रोहितकडेही उत्तर नव्हते. मधुशंका आणि कसुन रजिथाने दमदार गोलंदाजी करत विराट आणि शुबमनला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनी सावध फलंदाजी करत हळूहळू भागीदारी रचली. दोघांनीही संघाला दोनशेच्या जवळ पोहोचवले. दोघांचीही शतके हुकली. मधुशंकाने प्रथम शुबमनला 92 धावा (11 चौकार आणि 2) आणि विराटला 88 (11 चौकार) धावांवर रोखले. त्यानंतर आलेले केएल राहुल (21) आणि सूर्यकुमार यादव (21) स्वस्तात बाद झाले. श्रेयस अय्यरने घरच्या प्रेक्षकांना नाराज केले नाही. त्याने 6 आणि 3 चौकारांची आतषबाजी करत 70 धावांची सुंदर खेळी केली. मदुशंकाने त्याच्या रुपात आपली पाचवी विकेट घेतली. त्याने आपल्या 10 षटकात 80 धावा खर्च केल्या. भारताने 50 षटकात बाद धावा फलकावर लावल्या.

हेही वाचा – VIDEO : रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड, पत्नी रितिका पाहतच बसली!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, कसुन राजिथा, महिष थिक्षणा, दिलशान मधुशंका, दुष्मंथा चमिरा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment