

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यांचा पहिला सामना आज (२९ जुलै) रात्री ८ वाजता त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. सलामीवीर रोहित शर्मानं या सामन्यासाठी सर्व तयारी केली आहे. तो आज वेस्ट इंडिजची धुलाई करण्याच्या पूर्ण मूडमध्ये दिसत आहे. खरं तर रोहितनं स्वतः याबाबतचे संकेत दिले आहेत. नेट्समध्ये सराव करताना त्याने लांब शॉट्स मारले आहेत.
बीसीसीआयनं शेअर केला व्हिडिओ!
रोहितच्या या सरावाचा व्हिडिओ स्वतः भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) शेअर केला आहे. भारतीय बोर्डानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ”टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव करत आहे. शॉट्स खेळत असताना, रोहितच्या बॅटमधून एक मोहक आवाजही ऐकू येतो.” या व्हिडिओत रोहित शर्मा हेलिकॉप्टर शॉटही खेळताना दिसून येतो.
हेही वाचा – VIDEO : मराठी चाहत्यासोबत गप्पा मारताना दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; रोहित म्हणाला…
Sound 🔛 🔊#TeamIndia captain @ImRo45 warming up in the nets ahead of the 1st #WIvIND T20I. 👌 👌 pic.twitter.com/0V5A70l2EY
— BCCI (@BCCI) July 29, 2022
अलीकडेच शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा त्याच्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. या मालिकेतून रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात आली होती. पण आता या टी-२० मालिकेद्वारे रोहित टीम इंडियामध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन करत आहे.
हेही वाचा – BGMI खेळणाऱ्यांसाठी धक्का..! PUBG नंतर हा गेमही भारतात बॅन? काय झालंय वाचा!
अनुभवी विराट कोहलीला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी श्रेयस अय्यर मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर उतरण्यासाठी हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा हे तीन खेळाडू मोठे दावेदार आहेत. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मासमोर संघाचं संयोजन शोधण्याचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. रोहित चौथ्या क्रमांकावर कोणाला संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ:
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिज: निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), शामराह ब्रूक्स, डॉमिनिक ड्रेक, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, डेव्हॉन थॉमस आणि हेडन वॉल्श जूनियर.
टी-२० मालिकेचे वेळापत्रक –
- पहिला टी-२० सामना – २९ जुलै
- दुसरा टी-२० सामना – १ ऑगस्ट
- तिसरा टी-२० सामना – २ ऑगस्ट
- चौथा टी-२० सामना – ६ ऑगस्ट
- पाचवा टी-२० सामना – ७ ऑगस्ट