IPL 2023 CSK vs GT : धोनी पहिल्याच मॅचमधून बाहेर? गुजरातविरुद्ध CSK चा कॅप्टन कोण?

WhatsApp Group

IPL 2023 : आजपासून आयपीएलचा थरार सुरू होत आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs GT) यांच्यात होईल. मात्र या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी शंका निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२३ चा पहिला सामना खेळणार का याबाबत शंका उपस्थित झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या १६व्या मोसमातील पहिला सामना आज गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. असे वृत्त होते की, सराव सत्रादरम्यान धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो सामन्याच्या एक दिवस आधी नेट्समध्ये फलंदाजीलाही आला नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धोनीची ही दुखापत CSK आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.

याबाबत CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांना विचारले असता ते म्हणाले की, कर्णधार १०० टक्के खेळेल. मला इतर कोणत्याही घडामोडींची माहिती नाही. अशा स्थितीत आता प्रश्न उपस्थित होत आहे की जर धोनी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार? जर आपण संभाव्य नावांवर नजर टाकली तर सीएसकेकडे संघात चार कर्णधारपदाचे पर्याय आहेत, ज्यात दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू आहेत.

हेही वाचा – Rules Changing From 1 April : तुम्हाला माहितीये…1 एप्रिलपासून ‘या’ 6 गोष्टी बदलणार! वाचा

जर धोनी गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिला सामना खेळला, तर CSK त्याच्या जागी कर्णधार म्हणून पहिला पर्याय म्हणून बेन स्टोक्सची निवड करू शकेल. CSK चा भावी कर्णधार म्हणून त्याला संघात समाविष्ट केले आहे. स्टोक्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आक्रमक कर्णधारपदाची छाप सोडली आहे. पण स्टोक्सची समस्या ही आहे की तोही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत संघ इतर पर्यायांचाही शोध घेत राहील.

CSK कडे दुसरा परदेशी खेळाडू म्हणून मोईन अलीच्या रूपाने पर्याय आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत मोईनने अलीकडेच इंग्लंड टी-20 संघाची जबाबदारी स्वीकारली. मोईनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 11 सामने खेळले ज्यात संघाला 5 वेळा विजय मिळवता आला. अशा स्थितीत सीएसकेला पहिल्या सामन्यात त्याचा अनुभव वापरता येईल.

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंच्या पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, या शर्यतीत रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे आहेत. गेल्या मोसमात धोनीने जडेजाकडे संघाची कमान सोपवली होती, पण हा अष्टपैलू खेळाडू कर्णधारपदाचा दबाव सहन करू शकला नाही, त्यामुळे त्याने मोसमाच्या मध्यात धोनीकडे कर्णधारपद सोपवले. दुसरीकडे, जर आपण अजिंक्य रहाणेबद्दल बोललो, तर त्याच्याकडे आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे, परंतु तो सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवेल की नाही हा मोठा प्रश्न आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघ:

बेन स्टोक्स, दीपक चहर, एमएस धोनी, मोईन अली, अंबाती रायुडू, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगेरगेकर, प्रशांत सोळंकी, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, महिष टेकशाना, निशांत सिंधू, ए. ड्वेन प्रिटोरियस, अजय मंडल, सुभ्रांशु सेनापती, आकाश सिंग, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, भगत वर्मा, शेख रशीद, तुषार देशपांडे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment