

IPL 2023 Prize Money : आयपीएल 2023 आता त्याच्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. रविवारी (28 मे) चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या आयपीएल फायनलकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या अंतिम सामन्यानंतर बक्षिसांचा पाऊस पडेल.
आयपीएल चॅम्पियन बनणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहेत, तर अंतिम फेरीत हरणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसर्या क्रमांकाचा संघ मुंबई इंडियन्स आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सलाही मोठी रक्कम मिळणार आहे. याशिवाय इतर पुरस्कारही देण्यात येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या पुरस्कारासाठी, किती रक्कम मिळणार आहे…
The 𝗙𝗜𝗡𝗔𝗟𝗜𝗦𝗧𝗦 of #TATAIPL 2023 🏆
It's going to be the Chennai Super Kings facing the Gujarat Titans in the summit clash 🙌
BRING. IT. ON 😍 pic.twitter.com/FYBhhsN808
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
हेही वाचा – Toyota Innova गाडीची किंमत वाढली! आता मिळेल ‘इतक्या’ लाखांना; जाणून घ्या!
• विजेता संघ – 20 कोटी रुपये
• उपविजेता – 13 कोटी रुपये
• संघ क्रमांक तिसरा (मुंबई इंडियन्स) – 7 कोटी रुपये
• चार नंबरचा संघ (लखनऊ सुपर जायंट्स) – 6.5 कोटी रुपये
• स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू – 20 लाख रुपये
• सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – रु 15 लाख
• ऑरेंज कॅप – रु 15 लाख (सर्वाधिक धावा)
• पर्पल कॅप – रु 15 लाख (सर्वाधिक बळी)
• मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन – 12 लाख रुपये
• सर्वाधिक SIX- रु. 12 लाख
• गेम चेंजर ऑफ द सीझन – 12 लाख रुपये
IPL 2023 मध्ये प्लेऑफसह एकूण 74 सामने आयोजित करण्यात आले आहेत. यादरम्यान, लीग टप्प्यात एकूण 70 सामने खेळले गेले, ज्यात 18 डबल हेडरचा समावेश होता. यावेळी गुवाहाटी, धरमशाला येथेही आयपीएल सामने आयोजित करण्याची संधी मिळाली. धर्मशाला हे पंजाब किंग्ज आणि गुवाहाटी राजस्थान रॉयल्सचे होम ग्राउंड होते. याशिवाय अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई येथेही सामने खेळवण्यात आले आहेत.
साखळी सामने संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही.
IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा
• शुबमन गिल (गुजरात टायटन्स) – 851 धावा
• फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 730 धावा
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 639 धावा
• डेव्हॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्स) – 625 धावा
• यशस्वी जयस्वाल (चेन्नई सुपर किंग्ज) – 625 धावा
IPL 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स
• मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) – 28 विकेट्स
• राशिद खान (गुजरात टायटन्स) – 27 विकेट्स
• मोहित शर्मा (गुजरात टायटन्स) – 24 विकेट्स
• पीयुष चावला (मुंबई इंडियन्स) – 22 विकेट्स
• युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) – 21 विकेट्स
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!