RCB vs CSK Dream 11 : धोनी की विराट? आज ड्रीम टीम कशी असेल? जाणून घ्या!

WhatsApp Group

IPL 2023 RCB vs CSK Dream 11 team Prediction : आयपीएल 2023 आता चौथ्या आठवड्यात प्रवेश करत आहे आणि या आठवड्यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. मागील सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला आहे. त्याचवेळी चेन्नईचाही मागच्या सामन्यातील पराभव विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल.

पीच रिपोर्ट

आयपीएलच्या चालू हंगामातील हा चौथा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 170 हून अधिक धावा केल्या आहेत. खेळपट्टीवरून फलंदाजांना अधिक मदत मिळताना दिसेल. त्यानुसार, चाहत्यांना जास्त स्कोअरिंग सामना पाहता येईल.

हेही वाचा – स्कॉर्पिओपेक्षा भारी..! Mahindra च्या ‘या’ गाडीची सर्वाधिक विक्री; किंमत १० लाखांपेक्षा कमी!

हेड-टू-हेड

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूयांच्यात आयपीएलच्या इतिहासात 31 वेळा सामना झाला आहे. यातील 20 सामने चेन्नईने, तर 10 सामने आरसीबीने जिंकले आहेत.

RCB vs CSK : आमची ड्रीम टीम!

  • यष्टीरक्षक – डेव्हॉन कॉनवे
  • फलंदाज – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे
  • अष्टपैलू – रवींद्र जडेजा, ग्लेन मॅक्सवेल,
  • गोलंदाज – मोहम्मद सिराज, विजय कुमार विशाक, वेन पार्नेल आणि तुषार देशपांडे.
  • कर्णधार – विराट कोहली
  • उपकर्णधार – रवींद्र जडेजा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment