IPL 2024 KKR vs SRH : हर्षित राणाचा मयंक अग्रवालला तोंडावर फ्लाईंग किस, पाहा अग्रेशनचा Video

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs SRH Harshit Rana vs Mayank Agarwal | आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद ईडन गार्डन्सवर एकमेकांशी भिडले. यात दोन्ही संघातील दोन खेळाडूंमध्ये ‘अग्रेशन’ पाहायला मिळाले. या सामन्यात हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर कोलकाताने हैदराबादला 209 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला 60 धावांची सलामी दिली. कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने मयंकला रिंकू सिंहकरवी झेलबाद केले.

मयंकची विकेट काढल्यानंतर हर्षितने त्याच्या तोंडासमोर जाऊन फ्लाईंग किस दिला. यानंतर दोघांनी एकमेकांकडे रागाने पाहिले. दोघांचे हे अग्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झाले. मयंकने 4 चौकार आणि एका षटकारासह 32 धावांची खेळी केली.

हेही वाचा – IPL 2024 KKR Vs SRH : आंद्रे रसेलची तुफानी खेळी! 102 मीटरचा षटकार, हैदराबादला 209 धावांचे आव्हान

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.

कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरिन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment