

IPL 2024 KKR vs SRH | आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ईडन गार्डन्सवर रंगतदार सामना पाहायला मिळाला. यात कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर कोलकाताने हैदराबादला 209 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात हेनरिक क्लासेनने अयशस्वी झुंज दिली. तीन षटकात जवळपास 60 धावांची गरज असता क्लासेनने सामना 5 चेंडू 7 धावा इतक्या जवळ आणला. पण केकेआरचा गोलंदाज हर्षित राणाने क्लासेनला झेलबाद करून सामना केकेआरच्या बाजुला झुकवला. शॉर्ट थर्डपासून मागे धावत जात सुयश शर्माने क्लासेनचा अदभुत झेल टिपला.
क्लासेनने 29 चेंडूत 8 षटकारांसह 63 धावांची खेळी केली. शाहबाज अहमदने त्याला साथ दिली. शाहबाज हर्षित राणाच्या शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने 5 चेंडूत 16 धावा केल्या. हैदराबादसाठी मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा यांनी 60 धावांची सलामी दिली. कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने मयंकला रिंकू सिंहकरवी झेलबाद केले. अभिषेक शर्माही 32 धावा काढून बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी (20), एडन मार्कराम (18), अब्दुल समद (15) यांना मोठी खेळी करता आली नाही. केकेआरकडून राणाने सर्वाधिक 3 बळी घेतले. रसेलने 2 विकेट्स काढल्या.
हेही वाचा – IPL 2024 KKR Vs SRH : हर्षित राणाचा मयंक अग्रवालला तोंडावर फ्लाईंग किस, पाहा अग्रेशनचा Video
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरिन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा