

IPL 2024 RCB vs CSK Faf Du Plessis Catch : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कप्तान फाफ डू प्लेसिसने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात अविश्वसनीय झेल टिपला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात डू प्लेसिसने मोक्याच्या क्षणी चेन्नईचा फलंदाज मिचेल सँटनरचा मि़ड ऑफला हवेत झेपावत सुरेख झेल टिपला. प्लेऑफच्या चौथ्या क्रमांकासाठी ही लढत होती. यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 201 धावा करणे गरजेचे होते.
आरसीबीच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कप्तान ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॅरिल मिचेलही (4) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने (33) रचिन रवींद्रला उत्तम साथ दिली. रवींद्रने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. रचिन धावबाद झाला. इम्पॅक्ट खेळाडू शिवम दुबेलाही (7) जास्त काही करता आले नाही. त्यानंतर आलेला मिचेल सँटनर डू प्लेसिसच्या जबरदस्त कॅचमुळे तंबूत परतला.
𝐖𝐇𝐀𝐓. 𝐓𝐇𝐄. 𝐅𝐀𝐅. 🤯#TATAIPL #RCBvCSK #IPLonJioCinema pic.twitter.com/GWuERdGUCL
— JioCinema (@JioCinema) May 18, 2024
हेही वाचा – RCB Vs CSK : आयपीएलमध्ये फिक्सिंग? फाफ डू प्लेसिसला आऊट दिल्यावर RCB चाहते भडकले!
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज – रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), डॅरिल मिचेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महीष थिक्षना.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा