IPL 2026 आधी मोठा धक्का! 7 संघांचे 10 स्टार खेळाडू बाहेर, एका कर्णधारालाही दुखापत

WhatsApp Group

IPL 2026 Injured Players : इंडियन प्रीमियर लीग 2026 सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत असताना काही संघांना मोठा धक्का बसला आहे. कारण या हंगामाच्या सुरुवातीलाच अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत, तर काही खेळाडू सुरुवातीचे सामने गमावणार आहेत.

यामुळे अनेक संघांच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एका संघाचा कर्णधारही दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही.

कोलकाता नाईट रायडर्सला सर्वाधिक फटका

Kolkata Knight Riders या संघाला सर्वाधिक फटका बसला आहे. संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेबाहेर गेले आहेत, तर काहीजण सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसतील. संघाचा वेगवान गोलंदाज Akash Deep लोअर बॅक दुखापतीमुळे IPL 2026 मधून बाहेर झाला आहे.

याशिवाय Harshit Rana याची फिटनेसही संघासाठी मोठी चिंता ठरली आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो पूर्णपणे फिट नसल्याने त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. तसेच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज Matheesha Pathirana अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. T20 विश्वचषकादरम्यान पिंडरीत ताण आल्यामुळे तो एप्रिलच्या मध्यापर्यंत संघात सामील होण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबादला कर्णधाराचा धक्का

Sunrisers Hyderabad संघाचा नियमित कर्णधार Pat Cummins सध्या पाठदुखीच्या समस्येतून सावरत आहे. त्यामुळे तो स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर Jack Edwards पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

राजस्थान रॉयल्सलाही मोठा धक्का

Rajasthan Royals संघाचा स्टार ऑलराउंडर Sam Curran T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ग्रोइन दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे तो IPL 2026 मधून पूर्णपणे बाहेर झाला आहे.

RCB च्या गोलंदाजीवर परिणाम

Royal Challengers Bengaluru संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज Josh Hazlewood हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अजून पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.

CSK ला मोठी कमतरता

Chennai Super Kings संघाचा वेगवान गोलंदाज Nathan Ellis जुनी हॅमस्ट्रिंग दुखापत बळावल्यामुळे IPL 2026 मधून बाहेर झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची अडचण

Delhi Capitals संघाचा स्टार वेगवान गोलंदाज Mitchell Starc वर्कलोड व्यवस्थापनामुळे सुरुवातीचे सामने खेळणार नाही. त्यामुळे संघाच्या गोलंदाजीच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो.

पंजाब किंग्सलाही धक्का

Punjab Kings संघाचा वेगवान गोलंदाज Lockie Ferguson कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सात सामन्यांना मुकणार आहे. नुकत्याच झालेल्या मुलाच्या जन्मानंतर तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment