

Messi Gift To MS Dhonis Daughter Ziva : फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने २०२२ साली इतिहास रचला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली त्याने प्रदीर्घ कालावधीनंतर विश्वचषक जिंकला. मेस्सीने विजयानंतर सुमारे एक आठवड्यानंतर भारताचा माजी महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा हिला एक अद्भुत भेट पाठवली आहे. एक या गिफ्टमुळे सर्वत्र चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने खुलासा केला होता की, मेस्सीने बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांना स्वाक्षरी असलेली जर्सी पाठवली होती. आता मेस्सीने धोनीची मुलगी झिवासाठी आणखी एक टी-शर्ट पाठवल्याचेही समोर येत आहे. झिवाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मेस्सीने गिफ्ट केलेली जर्सी दिसत आहे. मेस्सीची फॅन फॉलोइंग भारतात करोडोंच्या घरात आहे. धोनीही फुटबॉलचा मोठा चाहता आहे. काही वर्षांपूर्वी त्याने मेस्सीबद्दल एक ट्वीटही केले होते. मात्र, धोनी सोशल मीडियापासून दूर राहतो. या गिफ्ट केलेल्या जर्सीबाबत एमएस धोनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा – Jan Dhan Account : आनंदाची बातमी..! आता जन धन खाते उघडल्यावर मिळणार पूर्ण १०,००० रुपये; जाणून घ्या!
मेस्सीचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण
लिओनेल मेस्सीला त्याच्या कारकिर्दीत एकही विश्वचषक ट्रॉफी जिंकता आलेली नाही. फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात त्याचे स्वप्न साकार झाले. ९० मिनिटे अर्जेंटिना आणि फ्रान्सचे दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. अतिरिक्त वेळेनंतर सामना ३-३ असा बरोबरीत होता. या सामन्यात मेस्सीने एकूण २ गोल केले. मेस्सीचे आता वर्ल्ड कपमध्ये एकूण १२ गोल झाले आहेत.