Online Gaming Bill 2025 : जर तुम्हीही फँटसी क्रिकेट, लूडो, रमी, पोकरसारख्या ऑनलाइन गेम्समध्ये पैसे लावून लाखोंच्या कमाईचे स्वप्न पाहत असाल, तर आता सावध व्हा. भारत सरकारने नुकताच 2025 चा ‘Promotion and Regulation of Online Gaming Bill’ लोकसभेत मंजूर केला असून, यामुळे संपूर्ण ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीवर जबरदस्त परिणाम होणार आहे. हा कायदा राज्यसभेतही संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीने लागू होईल. त्यानंतर ऑनलाइन गेमिंगचं चित्र संपूर्णपणे बदलणार आहे.
1. गेमिंगची नवीन तिन्ही श्रेणी – काय होणार काय?
सरकारने ऑनलाइन गेम्स तीन प्रकारात विभागले आहेत:
- ई-स्पोर्ट्स – जसे की शतरंज, पबजी, फ्री फायर.
- सोशल गेम्स – शिक्षणप्रधान, सब्स्क्रिप्शन आधारित गेम्स.
- मनी गेम्स – जिथे पैसे लावले जातात आणि जिंकण्याची आशा दिली जाते.
ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल, तर ‘मनी गेम्स’वर कडक बंदी घालण्यात येणार आहे. अशा गेम्समुळे आर्थिक नुकसान, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला आर्थिक मदत होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
The Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 passed by the Parliament.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 21, 2025
The Bill takes a balanced approach – promoting what’s good, prohibiting what’s harmful for middle-class and youth.
Here’s a quick explainer 👇🧵 pic.twitter.com/q4Pthsrb2V
2. पबजी, फ्री फायर, GTA वाचले! पण…
पबजी, फ्री फायर, GTA यांसारख्या गेम्समध्ये प्रत्यक्ष पैसे लावले जात नाहीत. त्यामुळे हे गेम्स ई-स्पोर्ट्समध्ये समाविष्ट होतील. मात्र, रमी, पोकरसारखे ‘रिअल मनी गेम्स’ कायद्यात अडकतील.
3. या गेम्सवर सरळ बंदी!
बिलाच्या कलम 2(G) नुसार ज्या गेम्समध्ये खेळाडू पैसे लावतो आणि त्यातून पैसे जिंकण्याची शक्यता असते, ते थेट बॅन केले जातील. यामध्ये Fantasy Cricket, Teen Patti, Online Poker, Card Games यांचा समावेश होतो.
4. सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसरना धक्का!
ऑनलाइन मनी गेम्सचा प्रचार करणाऱ्या क्रिकेटपटू, बॉलीवूड स्टार्सना आता कारवाईचा सामना करावा लागेल.
- त्यांना 2 वर्षांची जेल आणि 50 लाखांचं दंड होऊ शकतो.
- इन्फ्लुएंसर्सवरही मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
5. गेमिंग कंपन्यांची गोची – डायरेक्टर अडकणार!
कंपनी जर नियमबाह्य गेम्स चालवत असेल, तर त्या कंपनीचे डायरेक्टर, मॅनेजर आणि जबाबदार अधिकारी गुन्हेगार ठरतील. मात्र, स्वतंत्र डायरेक्टरवर कारवाई होणार नाही.
6. विदेशी गेमिंग अॅप्सवरही ‘ब्लॉक’ची तयारी
कायद्याचे कलम 1(2) स्पष्ट सांगते की, भारतातच नव्हे तर परदेशातून चालवल्या जाणाऱ्या गेमिंग अॅप्सवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे भारतात वापरले जाणारे बरेच फँटसी गेमिंग आणि बेटिंग अॅप्स आता ब्लॉक होऊ शकतात.
7. बँकिंग आणि पेमेंट अॅप्सवर बंधन!
कलम 7 नुसार, आता बँक आणि वॉलेट अॅप्स या प्लॅटफॉर्म्सवर पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. म्हणजे, PayTM, GPay, PhonePe यांद्वारे रिअल मनी गेमिंगसाठी व्यवहार थांबवले जातील.
गेमिंग इंडस्ट्रीचा विरोध
2 लाख कोटींच्या ऑनलाइन गेमिंग मार्केटने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
- All India Gaming Federation आणि Federation of Indian Fantasy Sports यांनी पत्र लिहून या बंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.
- याऐवजी रेग्युलेशनचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!