

India vs Pakistan Asia Cup controversy : एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताकडून पाच गडी राखून पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने केवळ भारतीय संघाच्या ‘नो-हँडशेक’ निर्णयावर टीका केली नाही, तर एक धक्कादायक घोषणा करत सांगितलं की, “संपूर्ण मॅच फी त्या कुटुंबियांना दान करण्यात येईल, जे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झाले आहेत.”
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मदत?
भारतीय लष्कराने काही महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या अनेक दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. या कारवाईत दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील सदस्यांचाही अंत झाला होता.
Salman Ali Agha: “We are donating our match fees to the civilians and the children that were martyred in the Indian attack”
— Ijaz Khan (@IjazKhanYOP) September 29, 2025
What a wonderful statement. He won our hearts 🇵🇰♥️♥️♥️#INDvsPAK #indvspak2025 #AsiaCup2025 #IndianCricket #deprem pic.twitter.com/0lFjiFFqLK
आता सलमान आगा याने जाहीर केल्याप्रमाणे, ही मॅच फी अशाच व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिली जाणार असल्याने पाकिस्तानचा दहशतवाद्यांप्रती असलेला झुकाव पुन्हा एकदा समोर आला आहे. सोशल मीडियावर यावर मोठा गदारोळ असून, भारतीय चाहते म्हणत आहेत की “पाकिस्तानने पुन्हा सिद्ध केलं की ते दहशतीविरुद्ध नाही, तर दहशतीसोबत उभं आहे.”
Undefeated ✅
— BCCI (@BCCI) September 29, 2025
Dominating ✅
Victorious ✅#TeamIndia's #AsiaCup2025 campaign was pure mastery 🏆 😎 pic.twitter.com/kkM1jM7gtD
हेही वाचा – हजारो लोक, एक झाड पडलं, आणि थेट मृत्यू! काय घडलं विजयच्या रॅलीत?
सलमान आगाचा भारतावर निर्लज्ज आरोप
प्रेस कॉन्फरन्समध्ये आगा म्हणाला, “भारताच्या वागणुकीमुळे क्रिकेटचा अपमान झाला आहे. त्यांनी केवळ आमच्याशीच नव्हे तर या खेळाशीही अनादर केला आहे.” त्याचा रोख भारतीय संघाने पाकिस्तानशी हात न मिळवणं आणि सामन्यापूर्वीच्या फोटोशूटमध्ये सहभागी न होणं याकडे होता.
सूर्यकुमार यादववर खोटे आरोप
सलमान आगा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर वैयक्तिक पातळीवर हातमिळवणी करताना आणि सार्वजनिकपणे टाळताना भेदभाव केल्याचा आरोप केला. पण, वास्तविकतेत सूर्यकुमार यादवने कधीही आगाशी हात मिळवलेला नाही, असं स्पष्ट झालं आहे.
ACC अध्यक्ष मोहसिन नकवीच्या वर्तनाचं समर्थन
ट्रॉफी हॅंडओव्हरच्या वेळी भारतीय संघाने ती घ्यायला नकार दिल्याचा दावा करत आगाने मोहसिन नकवीच्या वागणुकीचं समर्थन केलं. पण, नकवी हे PCB नव्हे, तर Asian Cricket Council चे अध्यक्ष होते, आणि त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी होती.
पाकिस्तानचा दहशतीला पाठिंबा पुन्हा उघड
या साऱ्या प्रकारांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते – पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांच्या बाजूने उभा आहे. सलमान आगाच्या घोषणेमुळे पाकिस्तानच्या ‘क्रिकेट डिप्लोमसी’चा खरा चेहरा जगासमोर आला आहे. अनेक भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “शर्मनाक! क्रिकेटच्या मैदानावरून दहशतवादाला आर्थिक मदत दिली जातेय.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा