IPL सोडून आता ऑस्ट्रेलियात धुमाकूळ, अश्विननं BCCI लाच चकित केलं

WhatsApp Group

Ravichandran Ashwin In BBL 2025 : भारताचा माजी आघाडीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आता ऑस्ट्रेलियात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन आता BBL (Big Bash League) मध्ये पदार्पण करणार आहे. तो सिडनी थंडर संघाकडून येत्या हंगामात खेळणार असून, अश्विन हा BBLमध्ये खेळणारा पहिला हाय-प्रोफाईल भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

‘Fox Sports’ च्या अहवालानुसार, सिडनी थंडर संघ या आठवड्याच्या अखेरीस अश्विनची अधिकृत घोषणा करेल. विशेष म्हणजे, अश्विनने BBL साठी होणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे Cricket Australia त्याला खास परवानगी देऊन करार करणार आहे.

IPL निवृत्तीचे कारण

अश्विनने IPL सोडताना म्हटले होते की, “आता माझं ध्येय जगभरातील टी-20 फ्रेंचायझी लीगमध्ये सहभागी होणं आहे.” कारण BCCI आपल्या सक्रिय खेळाडूंना परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे IPLमधून निवृत्ती ही त्या उद्दिष्टाचा भाग होती.

हेही वाचा – उज्ज्वला योजनेचा नवा टप्पा! २५ लाख महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन; घरीच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ऑस्ट्रेलियात पदार्पणाची तयारी सुरू!

सध्या 39 वर्षीय अश्विनने UAEमध्ये होणाऱ्या ILT20 लीगमध्येही नोंदणी केली आहे. ती लीग 4 जानेवारीला संपते आणि त्यानंतर अश्विन BBLसाठी थंडर संघात सामील होईल. BBL हंगाम 14 डिसेंबरपासून सुरू होणार असून 18 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO टॉड ग्रीनबर्ग यांनीही अश्विनशी वैयक्तिकरित्या संवाद साधून त्याला सामील होण्यासाठी आमंत्रित केल्याचे समोर आले आहे.

अश्विनचा इतिहासही तगडा

  • टेस्ट क्रिकेटमध्ये 537 विकेट्स घेऊन तो अनिल कुंबलेनंतर भारताचा दुसरा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू आहे.
  • IPL मध्ये त्याने 221 सामन्यांत 187 विकेट्स घेतल्या आहेत आणि 833 धावा सुद्धा केल्या आहेत.
  • त्याचं IPL मधील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन 4/34 असून सर्वोत्तम बॅटिंग स्कोअर 50 धावा आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment