Kevin Pietersen on Sarfaraz Khan : भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान सध्या टीम इंडियाच्या बाहेर असला तरी मैदानात पुनरागमनासाठी त्याने जबरदस्त मेहनत घेतली आहे. त्याने तब्बल १७ किलो वजन घटवून सर्व टीकाकारांना आपलं उत्तर दिलं आहे. याच बदलाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पीटरसनने इंस्टाग्रामवर सरफराजच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक करताना थेट पृथ्वी शॉचं नाव घेतलं आणि लिहिलं, “कोणी तरी पृथ्वी शॉला हे दाखवा. हे शक्य आहे! मजबूत शरीर, मजबूत मन!”
Kevin Pietersen appreciated Sarfaraz Khan's transformation and asked someone to show it to Prithvi Shaw. 👀#Cricket #India #Shaw #Sarfaraz #Sportskeeda pic.twitter.com/LDxttdjA3L
— Sportskeeda (@Sportskeeda) July 21, 2025
सरफराज खान : रणजीतला रनमशिन, पण फिटनेस होता अडथळा
सरफराज खानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. फिटनेस त्याच्यासाठी अडथळा ठरत होता. मात्र, 2024 साली इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेतून त्याला अखेर पदार्पणाची संधी मिळाली.
आता जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान मिळालं नाही, तेव्हा त्याने नकारात्मकतेऐवजी फिटनेस सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. आज तो पूर्णपणे फिट आणि नवीन जोशसह मैदानात परतण्यास सज्ज आहे.
पीटरसनचं पृथ्वी शॉला थेट संदेश
सरफराजच्या व्हायरल फोटोंवर केविन पीटरसनने लिहिलं, “शाब्बास, युवा! हे निश्चितच तुझ्या खेळात सकारात्मक बदल घेऊन येईल. तू तुझ्या प्राधान्यक्रमांची योग्य पुनर्रचना केली आहेस, हे पाहून आनंद झाला.” तसेच, त्याने पृथ्वी शॉचं नाव न घेता सल्ला दिला, “हे कोणी पृथ्वी शॉला दाखवा. हे नक्की शक्य आहे!”
पृथ्वी शॉचा संघर्ष
पृथ्वी शॉनेही करिअरच्या सुरुवातीला जबरदस्त छाप पाडली होती, पण त्याचा खेळ आणि ऑफफिल्ड वागणूक यामुळे त्याचं करिअर थोडं विस्कळीत झालं. आता शॉने मुंबईचा निरोप घेत महाराष्ट्रकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्पष्ट केलं, “या टप्प्यावर मला वाटतं, महाराष्ट्र संघात खेळल्याने माझ्या क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा मिळेल.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!