फक्त 7 धावांत 8 विकेट्स, टी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड!

WhatsApp Group

Sonam Yeshey World Record : भूतानचा डावखुरा फिरकीपटू सोनम येशी याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक अद्वितीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. म्यानमारविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने अवघ्या 7 धावांत 8 विकेट्स घेत इतिहास घडवला. केवळ 22 वर्षीय सोनमने केलेल्या या कामगिरीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

हा सामना शुक्रवारी (26 डिसेंबर) खेळवण्यात आला. आपल्या चार षटकांत केवळ 7 धावा देत 8 खेळाडूंना परत पाठवण्याचा पराक्रम करत त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 8 विकेट्स मिळवणारा गोलंदाज म्हणून नोंद झाली.

आतापर्यंत पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये फक्त दोन गोलंदाजांनी 7 विकेट्स घेतल्या होत्या —
स्याझुल इद्रुस (मलेशिया – 7/8 vs चीन, 2023)
अली दावूद (बहरीन – 7/19 vs भूतान, 2025)

पण 8 विकेट्सची कमाल प्रथमच घडली

या मालिकेत सोनम येशीने चार सामन्यांत एकूण 12 विकेट्स घेतल्या आहेत. सोमवार (29 डिसेंबर) रोजी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील विक्रमी गोलंदाज

महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार गोलंदाजांनी 7 विकेट्स घेतल्या आहेत —
• रोहमालिया (इंडोनेशिया – 7/0 vs मंगोलिया, 2024)
• फ्रेडरिक ओव्हरडिज (नेदरलँड्स – 7/3 vs फ्रान्स)
• अ‍ॅलिसन स्टॉक्स (आर्जेंटिना – 7/3 vs पेरू)
• समंती दूनुकेदेनीय (सायप्रस – 7/15 vs चेक रिपब्लिक)

सामन्याचा निकाल – भूतानचा 82 धावांनी विजय

भूतानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 बाद 127 धावा केल्या.
नांगांग चेजे याने जबरदस्त खेळी करत 45 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.

यानंतर गोलंदाजीत सोनम येशीने अक्षरशः धुडगूस घातला आणि म्यानमारचा डाव फक्त 45 धावांत 9.2 षटकांत संपुष्टात आला.

भूतान सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडीवर असून, सोमवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात क्लीन-स्वीप करण्याच्या तयारीत आहे.

ही कामगिरी ऐतिहासिक का आहे?

✔आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच 8 विकेट्स एका गोलंदाजाच्या झोळीत
✔ फक्त 22 वर्षांच्या खेळाडूची जबरदस्त कामगिरी
✔ फिरकीला पुन्हा एकदा नवा आयाम
✔ भूतानसारख्या छोट्या संघातून जागतिक विक्रम

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment