Virat Kohli ICC Ranking : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण! टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने तब्बल 1404 दिवसांनंतर पुन्हा एकदा ICC वनडे फलंदाज क्रमवारीत नंबर-1 स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात खेळलेल्या 93 धावांच्या अफलातून खेळीचा थेट फायदा कोहलीला ICC रँकिंगमध्ये झाला. या कामगिरीसह विराटने आपल्या सहकारी खेळाडू रोहित शर्मा याला मागे टाकत पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज असल्याचा शिक्का मारला आहे.
न्यूझीलंडविरुद्धची खेळी ठरली निर्णायक
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने संयमी, आक्रमक आणि परिपक्व फलंदाजी करत 93 धावा ठोकल्या. गेल्या पाच वनडे सामन्यांत सातत्याने धावा करणाऱ्या कोहलीचा फॉर्म जबरदस्त आहे. याच फॉर्ममुळे ICC ने त्याला थेट नंबर-1 स्थान दिले.
4 वर्षांचा दुष्काळ संपला, कोहली पुन्हा टॉपवर
विराट कोहलीने 2021 च्या सुरुवातीला ICC वनडे रँकिंगमधील अव्वल स्थान गमावले होते. त्यावेळी पाकिस्तानचा बाबर आझम त्याच्यापेक्षा पुढे गेला होता. पण आता 4 वर्षांनंतर, कोहलीने पुन्हा एकदा आपली बादशाही सिद्ध केली आहे. या शर्यतीत न्यूझीलंडचा डेरिल मिचेल याने जबरदस्त टक्कर दिली, मात्र 785 रेटिंग पॉइंट्ससह कोहलीने अवघ्या 1 पॉइंटने मिचेलला मागे टाकत सिंहासनावर कब्जा केला.
ICC ODI Batters Rankings
1️⃣ विराट कोहली (भारत) – 785 रेटिंग
2️⃣ डेरिल मिचेल (न्यूझीलंड) – 784 रेटिंग
3️⃣ रोहित शर्मा (भारत) – 775 रेटिंग
रोहित शर्मा यांना दोन स्थानांचे नुकसान सहन करावे लागले असून ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.
हेही वाचा – Viral Video : नागाशी खेळणं महागात पडलं, 3 वेळा चावा, 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!
ICC ODI Bowlers Rankings
ICC वनडे गोलंदाज क्रमवारीत:
- राशिद खान (अफगाणिस्तान) – 710 रेटिंग
- जोफ्रा आर्चर (इंग्लंड) – 670 रेटिंग
- कुलदीप यादव (भारत) – 649 रेटिंग
ICC ODI All-Rounders Rankings
ICC मेंस वनडे ऑलराउंडर्स रँकिंगमध्ये:
- अजमतुल्लाह उमरजई (अफगाणिस्तान) – 334 रेटिंग
- भारताकडून अक्षर पटेल टॉप-10 मध्ये कायम
विराट कोहलीचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण केल्या. हा ऐतिहासिक क्षण त्याने न्यूझीलंडचा स्पिनर आदित्य अशोक याच्या चेंडूवर फटका मारत गाठला.
या विक्रमासह:
- विराट कोहली हे सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यानंतर
- 28,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारे जगातील तिसरे फलंदाज ठरले
विशेष म्हणजे, कोहलीने हा टप्पा फक्त 624 डावांत गाठत सर्वात जलद फलंदाज होण्याचा मान मिळवला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा