

MS Dhoni Acting : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीची आणि यष्टीरक्षणाची जादू आता चाहत्यांना फक्त आयपीएलमध्येच पाहायला मिळत आहे. धोनीचे चाहते जगभर भरले आहेत. क्रिकेटशिवाय धोनीने चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. धोनीच्या प्रोडक्शन हाऊसमधून लवकरच एलजीएम चित्रपट येणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी धोनीची पत्नी साक्षी धोनीने एक मोठे वक्तव्य केले आहे. साक्षीने सांगितले की, चाहत्यांचा आवडता धोनी चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसू शकतो.
धोनीची पत्नी साक्षीने नुकतेच सांगितले की, जर चित्रपटासाठी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर चाहत्यांचा आवडता कॅप्टन कूल अभिनय करताना दिसेल. साक्षीच्या या वक्तव्यानंतर धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
After being an hero in real life, MS Dhoni to become an hero in reel life too!
"If we plan to make a movie with #MSDhoni as Hero, then it will only be an action packed entertainer.
If a character with good story & good message comes, then MS Dhoni will consider acting in a… pic.twitter.com/YGrn0l2hCn
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) July 25, 2023
साक्षी धोनी नुकतीच निर्माती म्हणून तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘लेट्स गेट मॅरीड’ या डेब्यू चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईला पोहोचली होती. पत्रकार परिषदेत तिने धोनीच्या अभिनय पदार्पणाबाबत वक्तव्य केले आहे.
हेही वाचा – मुंबईत शाळा, कॉलेज बंद, सर्व परीक्षा रद्द! आज पावसाचा हाहाकार?
एलजीएमच्या प्रमोशनसाठी आलेल्या साक्षीला धोनीच्या चित्रपटातील अभिनयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावर साक्षीने उत्तर दिले की, माहीने अनेक जाहिराती केल्या आहेत. कॅमेऱ्यासमोर तो आत्मविश्वासाने राहतो. त्याला चांगले कसे वागायचे हे माहीत आहे. 2006 पासून तो अभिनय करत आहे. जर चांगली स्क्रिप्ट उपलब्ध झाली तर धोनी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकतो.
साक्षी पुढे म्हणाली की, जर मला त्याची निवड करायची असेल तर मला त्याला अॅक्शन चित्रपटात पाहायला आवडेल. कारण तो नेहमी अॅक्शनमध्ये असतो. साक्षीच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना पूर्ण आशा आहे की, धोनी लवकरच अॅक्शन चित्रपटात अभिनयाची जादू दाखवेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!