

India vs Pakistan T20 Match : आज महिला आशिया कप २०२२ चा सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्के करायचे आहे, तर पाकिस्तानच्या नजरा विजयी मार्गावर परतण्यावर लागल्या आहेत. भारताविरुद्धच्या या महान सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानला थायलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे संघाचे मनोधैर्य खचले असेल. चला भारत-पाकिस्तान सामन्याशी संबंधित काही महत्वाची माहिती पाहूया…
कधी, कुठे रंगणार मॅच?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हा टी-२० सामना दुपारी १ वाजता सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर सुरू होईल. नाणेफेकीची वेळ साडेबारा वाजता आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर केले जाणार आहे. तर लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी डिस्ने प्लस हॉटस्टारवर जावे लागेल. आमच्या वेबसाइटवरूनही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.
The Final 🇮🇳Huddle before the action begins 😍 #CricketTwitter #INDvPAK pic.twitter.com/lj9DirHPsc
— Female Cricket (@imfemalecricket) October 7, 2022
हेही वाचा – Pro Kabaddi 2022 : आजपासून ‘ले पंगा’..! पहिली मॅच यू मुंबा आणि ‘या’ संघात; वाचा स्पर्धेचं वेळापत्रक!
It's India vs Pakistan tomorrow in the Women's Asia Cup
Which team are you backing to win this? #CricketTwitter #AsiaCup2022 #WomensAsiaCup pic.twitter.com/hd6lJcOYbf
— Female Cricket (@imfemalecricket) October 6, 2022
भारतीय महिलांनी ६ वेळा आशिया चषक जिंकला असला, तरी शेवटच्या वेळी त्यांना अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. संघाला यावेळी पुन्हा चषक उचलायचा आहे. आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, संघाने आतापर्यंत खेळलेले तीनही सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर १५व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडलाही धूळ चारली आहे. भारतीय संघाने गेल्या सामन्यात यूएईचा १०४ धावांनी पराभव केला होता. यापूर्वी या संघाने श्रीलंका आणि मलेशियाचा पराभव केला आहे.