

World Cup 2023 IND vs AFG In Marathi : टीम इंडिया आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करण्यासाठी सज्ज आहे. या मैदानावर झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध 428 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत या सामन्यातही मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. सर्वांच्या नजरा होम बॉय विराट कोहलीवर असतील. या सामन्यात अफगाणिस्तानचा कप्तान हशमतुल्ला शाहिदीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात एक बदल! (IND vs AFG)
विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून घरच्या मैदानावर धूम ठोकण्यासाठी सज्ज आहे. त्याने दिल्लीत 15 डावात 779 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 2 शतकेही केली आहेत. आज भारताने (IND vs AFG News In Marathi) आपल्या संघात एक बदल केला आहे. रोहितने रवीचंद्रन अश्विनला बाहेर बसवून शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे. अफगाणिस्तानने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे.
दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 IND vs AFG)
भारत – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी(कप्तान), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमातुल्ला ओमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!