IND vs AUS : सुरुवात कशीही होऊ दे, शेवट गोडच! भारताची ऑस्ट्रेलियावर मात

WhatsApp Group

World Cup 2023 IND vs AUS News In Marathi : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने वर्ल्डकप 2023 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. चेपॉकवर रंगलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 गड्यांनी मात दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी समजून कांगारू संघाला 199 धावांत गुंडाळले. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाला चेंडू मिळाला तेव्हा टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली. सलामीवीर इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघेही शून्यावर तंबूत परतले. पण चेसमास्टर विराट कोहली आणि फॉर्मात असलेल्या केएल राहुलने दीडशतकी भागीदारी करत भारताला संकटातून बाहेर काढले. राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अवघ्या 2 धावांवर 3 विकेट पडल्या असताना विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. विराट कोहलीने 6 चौकारांसह 85 धावा केल्या तर राहुल 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 97 धावा केल्या. भारताने 41.2 षटकात हा सामना खिशात टाकला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआऊट! (World Cup 2023 IND vs AUS)

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या 199 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारताविरुद्ध खूप संघर्ष करताना दिसले. विशेषत: फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या जाळ्यात अडकवले होते. 10 पैकी 7 विकेट स्पिनरने घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 6 चौकारांसह 41 तर स्टीव्ह स्मिथने 5 चौकारांसह सर्वाधिक 46 धावा केल्या. भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवनेही 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

हेही वाचा – IND Vs AUS : रोहित शर्माने सोडला सोपा कॅच, जडेजाने दिली ‘अशी’ रिअॅक्शन, पाहा Video

दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 IND vs AUS)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – डेडेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कप्तान), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment