IND vs AUS : रोहित शर्माने सोडला सोपा कॅच, जडेजाने दिली ‘अशी’ रिअॅक्शन, पाहा Video

WhatsApp Group

Rohit Sharma Drops A Catch : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023 IND vs AUS) सुरू झाला आहे आणि आता भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील पहिला सामना खेळत आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी चुकीचा ठरला.

भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. मात्र, कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण ऑस्ट्रेलियाच्या डावात त्याने एक झेल (Rohit Sharma News In Marathi) सोडला. अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसबाबत चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

रवींद्र जडेजा भारतासाठी ऑस्ट्रेलियाच्या डावातील 44 वे षटक टाकत होता. अॅडम झाम्पा त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. या षटकातील चेंडू झाम्पाच्या बॅटची कड घेऊन रोहितकडे गेला, पण रोहितला तो घेता आला नाही.

हेही वाचा – Video : इस्त्रायलची तरुणी जीवाची भीक मागत होती, पण हमासच्या दहशतवाद्यांनी दया दाखवली नाही!

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या 199 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारताविरुद्ध खूप संघर्ष करताना दिसले. विशेषत: फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या जाळ्यात अडकवले होते. 10 पैकी 7 विकेट स्पिनरने घेतल्या. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवनेही 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment