

World Cup 2023 PAK vs SL In Marathi : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने करिष्माई कामगिरी केली आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठे धावांचे आव्हान गाठले. मोहम्मद रिझवानच्या शानदार शतकाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचा रंगतच बदलून टाकली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 9 गड्यांच्या मोबदल्यात 344 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवानच्या धाडसी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 48.2 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. रिझवानने 121 चेंडूत 131 धावांची नाबाद खेळी खेळली.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 344 धावा केल्या. कुसल मॅडिसने 122 धावांची स्फोटक खेळी केली तर सदीरा समरविक्रमाने 108 धावांची खेळी केली. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दोन गडी लवकर गमावले पण मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी अशी भागीदारी केली ज्यामुळे सामन्याचा मार्गच बदलला.
हेही वाचा – World Cup 2023 : टीम इंडियाचा 4 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! श्रीलंकेने रचला इतिहास
शफीकनंतर मोहम्मद रिझवानचे जबरदस्त शतक (World Cup 2023 PAK vs SL)
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी, नेदरलँड्सविरुद्धच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात संघाला अडचणीतून बाहेर काढल्यानंतर, मोहम्मद रिझवानने दुसऱ्या सामन्यातही धमाका केला. पहिल्यांदाच विश्वचषकात दाखल झालेला सलामीवीर अब्दुल्ला शफीकने शतक झळकावून पाकिस्तानला संकटातून सोडवले.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!