बंगळुरूत रस्त्यावर कचरा टाकलात, तर चारचौघात इज्जतच जाणार! वाचा…

WhatsApp Group

Bengaluru Garbage Rule : बंगळुरू शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रेटर बंगळुरू प्राधिकरणाने (GBA) आता एक हटके पण कडक पाऊल उचललं आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची आता खैर नाही! जे लोक आपला घरचा कचरा रस्त्यावर फेकून शहराला कचरापेटी समजतात, अशांना आता प्रशासनाकडून ‘रिटर्न गिफ्ट’ मिळणार आहे, तेही घरी बसल्या!

शहरात “Garbage Dumping Festival” नावाने सुरु झालेल्या या अनोख्या मोहिमेअंतर्गत, रस्त्यावर कचरा टाकताना पकडल्या गेलेल्या नागरिकांचा कचरा थेट त्यांच्या घरात परत फेकण्यात येणार आहे. याशिवाय अशा व्यक्तींवर 2,000 रुपयांचा दंडही आकारला जाणार आहे.

CCTV वर कडक नजर

बंगळुरू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (BSWML) चे मुख्य कार्यकारी अधिकारी करिगौडा यांनी माहिती दिली की, शहरामध्ये घरगुती कचरा गोळा करण्यासाठी जवळपास 5,000 गाड्या फिरतात. तरीही काही लोक रस्त्यावर कचरा फेकतात. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरभर CCTV बसवण्यात आले असून अनेकांचे व्हिडिओ क्लिप प्रशासनाकडे जमा झाल्या आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा, 30 जूनकडे सर्वांचे लक्ष!

सोशल मीडियावरही या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी याला कडक पण आवश्यक पाऊल म्हटलं आहे तर काहींना हे थोडं कठोर वाटतंय. प्रशासनाने मात्र स्पष्ट केले आहे की हा उपक्रम लोकांना शिक्षित करण्यासाठी असून, शहर स्वच्छ ठेवणे हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे.

 ‘गार्डन सिटी’ स्वच्छ ठेवण्याचा निर्धार

करिगौडा यांनी सांगितले की बंगळुरू हे “गार्डन सिटी” म्हणून देशभरात ओळखले जाते, त्यामुळे शहराची स्वच्छता व सौंदर्य टिकवणे आवश्यक आहे. ज्या भागात कचरा गोळा करणाऱ्यांची कमतरता आहे, तिथे मोठे कचरापेट्या बसवण्यात येत आहेत.

मुख्य पॉईंट्स

  • रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ — कचरा थेट घरी
  • 2,000 रुपयांचा दंड
  • शहरभर CCTV वर नजर
  • 5,000 कचरा संकलन गाड्या दररोज कामावर
  • मोठ्या कचरापेट्या बसवल्या जात आहेत

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment