बंगळुरूमध्ये 5000 भटक्या कुत्र्यांसाठी ‘चिकन राईस’ योजना; BBMP खर्च करणार 2.88 कोटी रुपये!

WhatsApp Group

Bengaluru Stray Dog Feeding Scheme : कर्नाटकाची राजधानी बंगळुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. बृहत बेंगळुरू महानगर पालिका (BBMP) ने ‘कुक्कुर तिहार’ या नव्या योजनेअंतर्गत भटक्या कुत्र्यांना पोषणमूल्ययुक्त ‘चिकन राईस’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत दररोज 5000 कुत्र्यांना 367 ग्रॅम चिकन राईस दिले जाणार असून, एकूण वार्षिक खर्च 2.88 कोटी रुपये होणार आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे काय?

या योजनेमागे केवळ भटक्या प्राण्यांना खाऊ घालणे हेच उद्दिष्ट नाही, तर नागरिकांना हे समजावणे आहे की पशुधारणा ही एक सामाजिक जबाबदारी आहे.

हेही वाचा – Viral Video : १५ कोटींच्या कर्जामुळे लखनऊत उद्योजकानं स्वत:ला संपवलं; फेसबुकवर शेवटचा व्हिडिओ

काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांचा आक्षेप

तमिळनाडूमधील काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी सोशल मीडियावर टीका करत म्हटले की, “कुत्र्यांना रस्त्यावर स्वच्छंद फिरण्याची मुभा देऊन त्यांना खाऊ घालणे म्हणजे सार्वजनिक आरोग्यासाठी धोका निर्माण करणे आहे.” त्यांनी भारतात 6.2 कोटी भटके कुत्रे असल्याचा दाखला दिला आणि 36% रेबीज मृत्यू भारतात होतात, हेही नमूद केले. त्यांनी राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी केली आहे.

BBMP ची योजना आणि टेंडर प्रक्रिया

BBMP ने 8 झोनमध्ये 5000 कुत्र्यांसाठी जेवण देण्याचा निर्णय घेतला असून, दररोज 22 रुपये प्रति कुत्रा खर्च अपेक्षित आहे.

  • झोन: ईस्ट, वेस्ट, साउथ, आरआर नगर, दसरहल्ली, बोम्मनहल्ली, येलहंका, महादेवपुरा
  • पहिल्या टप्प्यात 4000 कुत्र्यांना खाऊ देण्यात येईल
  • FSSAI-नोंदणीकृत केटरर्ससाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे
  • एक वर्षाचा करार, पुढे कामगिरीनुसार वाढवता येईल

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment