Viral Video : नागाशी खेळणं महागात पडलं, 3 वेळा चावा, 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

WhatsApp Group

Cobra Snake Bite Death : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. कोब्रा सापाशी (नाग) खेळण्याचा अति आत्मविश्वास 50 वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

कोब्रा सापाशी खेळ… आणि क्षणात आयुष्य संपलं!

रामपूर जिल्ह्यातील बिलासपूर तहसीलमधील पिपलिया गोपाळपूर गावात मंझरेच्या रस्त्यावर सुमारे 6 फूट लांबीचा विषारी कोब्रा साप दिसून आला. गावातीलच रहिवासी जी राज सिंह (वय 50), वडील – तुलसी यांनी हा साप हातात उचलून लोकांसमोर खेळायला सुरुवात केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जी राज सिंह अविवाहित होते आणि मानसिकदृष्ट्या काहीसे दुर्बल असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांनी स्वतःला “धाडसी” सिद्ध करण्याच्या नादात कोब्रा साप थेट गळ्यात घातला, लोकांसमोर पोज दिले आणि मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट होऊ दिला.

हेही वाचा – तेलंगणात अमानुष कृत्याचा कळस! ग्रामपंचायतींच्या आदेशावर 200 कुत्र्यांची सामूहिक हत्या?

ग्रामस्थांनी रोखलं… पण ऐकायलाच तयार नाही

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वारंवार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. “हे खूप धोकादायक आहे, साप सोडून द्या” अशी विनवणीही करण्यात आली. मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.

तीन वेळा दंश… आणि जागीच मृत्यू

क्षणात परिस्थिती बदलली. कोब्रा सापाने हात, कान आणि मानेवर अशा तीन ठिकाणी दंश केला. काही मिनिटांतच विष शरीरात पसरले आणि जी राज सिंह यांचा जागीच अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वनविभाग आणि पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. कोब्रा सापाला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

DFO प्रणव जैन यांचा गंभीर इशारा

रामपूरचे डीएफओ प्रणव जैन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले. “भारतामध्ये चार अत्यंत विषारी साप आढळतात, Indian Spectacled Cobra, Krait, Russell’s Viper आणि Saw-scaled Viper. यांच्याशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करणे अत्यंत धोकादायक आहे. प्रशिक्षणाशिवाय साप हाताळणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे.”

ते पुढे म्हणाले, “कोणालाही साप दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवा. स्वतः साप पकडण्याचा प्रयत्न कधीही करू नका.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment